​धनुष म्हणतो, मी डीएनए टेस्ट करणार नाही

‘षमिताभ’ आणि ‘रांझना’ यासारखे हिट सिनेमे देणारा साऊथ स्टार धनुष याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मेगास्टार रजनीकांतचा जावई असला तरी धनुष एका कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

​धनुष म्हणतो, मी डीएनए टेस्ट करणार नाही
Published: 12 Apr 2017 01:40 PM  Updated: 12 Apr 2017 01:40 PM

‘षमिताभ’ आणि ‘रांझना’ यासारखे हिट सिनेमे देणारा साऊथ स्टार धनुष याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मेगास्टार रजनीकांतचा जावई असला तरी धनुष एका कायदेशीर अडचणीत सापडला आहे. आता या प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका वृद्ध दांम्पत्याने केला आहे. धनुषची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी या दांम्पत्याने मद्रास हायकोर्टात केली होती. पण धनुषने डीएनए टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कुणी काहीही दावे केल्याने मी डीएनए टेस्ट करणार नाही. हे माझ्या खासगी आयुष्याशी निगडीत प्रकरण आहे. माझी प्रायव्हसीचे प्रकरण आहे, असे धनुषने म्हटले आहे.

ALSO READ : धनुषच्या खांद्यावरील तीळ गेला कुठे?

कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या तामिळ दांम्पत्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.  धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता, असा दावा या दांम्पत्याने केला आहे. दरम्यान धनुषने तामिळ दांम्पत्याचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत या दांपत्याने केलेला दावा हा पूर्णत: खोटा आहे. यांच्या हरवलेल्या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. मला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, असे त्याने म्हटले आहे. धनुषकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तुरी राजा यांचा मुलगा असून, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐवर्श्या हिचा पती आहे. धनुष बॉलिवूडमध्ये त्याच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्यातून चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने सोनम कपूरबरोबर ‘रांझणा’ या सिनेमात काम केले. या सिनेमानंतर तो महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षरा हसन यांच्याबरोबर ‘षमिताभ’मध्येही बघावयास मिळाला होता. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :