Exclusive : देसी गर्ल प्रियंका चोपडाने ‘आयफा’कडे का फिरविली पाठ? वाचा सविस्तर!

​न्यूयॉर्कमध्ये १८ व्या आयफा २०१७ ची धामधूम असताना बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा मुंबईत परतली आहे.

Exclusive : देसी गर्ल प्रियंका चोपडाने ‘आयफा’कडे का फिरविली पाठ? वाचा सविस्तर!
Published: 14 Jul 2017 10:20 PM  Updated: 14 Jul 2017 10:20 PM

न्यूयॉर्कमध्ये १८ व्या आयफा २०१७ ची धामधूम असताना बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा मुंबईत परतली आहे. इंडस्ट्रीमधील आघाडीची नायिका असताना तिची आयफामधील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत असून, प्रियंकाने आयफाकडे का पाठ फिरविली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यातच यंदाच्या आयफामध्ये प्रियंकाला किंवा तिच्या चित्रपटाला एकही नामांकन मिळाले नसल्याने तिने आयफाला जाणे टाळले असावे, अशी चर्चा रंगत असल्याने यामागचे नेमके वास्तव काय? असा संभ्रम तिच्या चाहत्यांमध्ये होत आहे. 

वास्तविक प्रियंका गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या अदा दाखवित आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पॉप्युलर झालेल्या प्रियंकाला आता हॉलिवूडपटांच्या आॅफर्स येत आहेत. ‘बेवॉच’ या चित्रपटात झळकल्यानंतर तिने ‘अ किड लाइक जेक’ या दुसºया हॉलिवूडपटाची शूटिंग पूर्ण केली. आता ती तिच्या तिसºया ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील एक सीन्स लिक झाला होता. याशिवाय ती एका हॉलिवूडपटाच्या निर्मितीचाही विचार करीत आहे. अशात ती बॉलिवूडमधून गायब झाल्याने बºयाच काळापासून ती बॉलिवूडपटात झळकलेली नाही. 

असो, प्रियंकाच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड करिअरचा ग्राफ बघितल्यास, तिची गणना आघाडींच्या नायिकांमध्ये केली जाते. त्यामुळे तिच्याविना आयफा असा कदाचित तिच्या चाहत्यांनी तरी विचार केला नसेल. परंतु सगळे उलटे घडत असून, जेव्हा बॉलिवूडकर न्यूयॉर्कच्या वाटेवर होते, तेव्हा प्रियंकाने मुंबई गाठली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाचा वाढदिवस १८ जुलै रोजी असून, आपल्या परिवारासोबत तिला सेलिब्रेशन करता यावे याकरिताच ती मुंबईत परतली आहे; मात्र आयफाला अनुपस्थित राहण्याचे हेच कारण आहे काय? हे फारसे पटण्यासारखे नाही. 



प्रियंकाच्या सोशल अकाउंटचा आढावा घेतल्यास, त्यावर स्पष्टपणे दिसून येते की, प्रियंका आयफाला प्रचंड मिस करत आहे. वास्तविक प्रियंकाचे भलेमोठे कटआउट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वायरवर झळकत आहे. न्यूयॉर्क येथे पोहोचलेल्या बºयाचशा सेलिब्रिटींनी हे पोस्टर बघून प्रियंकाची अनुपस्थिती अधोरेखित केली. अभिनेता बोमन इराणीने ट्विट करताना लिहिले की, ‘टाइम्स स्क्वायर येथे पाच वाजता फिरताना अचानकच प्रियंका चोपडाची भेट झाली.’ प्रियंकानेदेखील बोमनला रिट्विट करीत लिहिले की, ‘मी अशी जाणूनबुजून केले आहे. जेणेकरून तुम्हाला घरी असल्याची जाणीव व्हावी. अपेक्षा करते की, तुम्ही टाइमला एन्जॉय कराल.’ प्रियंकाच्या या ट्विटनंतर मनीष पॉल यानेदेखील ट्विट करीत लिहिले की, ‘पहा मी टाइम्स स्क्वायर येथे कोणाला बघितले, खूपच चांगले वाटत आहे.’

असो, प्रियंका आयफाला का उपस्थित राहिली नाही? याचे कारण काहीही असो. परंतु तिच्या चाहत्यांना तिला आयफा सोहळ्यात बघायचे होते, हे निश्चित. प्रियंकाची ही अनुपस्थिती तिच्या चाहत्यांसाठी निराशाजनक असेल यात शंका नाही. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :