Shocking : श्रद्धाचा ‘हसीना’ हिट व्हावा म्हणून पप्पा शक्ती कपूर करणार ‘हा’ कारनामा!!

​कालच श्रद्धा कपूर हिच्या ‘हसीना : द क्वीन आॅफ मुंबई’ या अंडरवर्ल्डवर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Shocking : श्रद्धाचा ‘हसीना’ हिट व्हावा म्हणून पप्पा शक्ती कपूर करणार ‘हा’ कारनामा!!
Published: 17 Jun 2017 05:16 PM  Updated: 17 Jun 2017 05:16 PM

कालच श्रद्धा कपूर हिच्या ‘हसीना : द क्वीन आॅफ मुंबई’ या अंडरवर्ल्डवर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. आता याच चित्रपटासंबंधित आणखी एक बातमी पुढे येत असून, आपल्या मुलीचा चित्रपट सुपरहिट करण्यासाठी पप्पा शक्ती कपूर स्वत: मैदानात उतरणार आहेत. यापूर्वीदेखील शक्ती यांनी श्रद्धाच्या चित्रपटासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र यावेळेस शक्ती वेगळीच क्लुप्ती वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

अपूर्व लिखिया दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम याची बहीण श्रद्धा पारकर हिची भूमिका साकारणार आहे. हसीनाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखविली जाणार आहे. चित्रपटात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर दाउदची भूमिका साकारत असून, काल रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये दोघा भावांमधील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.  वास्तविक आतापर्यंत श्रद्धाने तिच्या चित्रपटांमध्ये कॉलेज गोइंग मुलगी किंवा नाजूक सुकुमार मुलीची भूमिका साकारली असल्याने ती ‘हसीना’मध्ये पहिल्यांदाच डॅशिंग अंदाजात प्रेक्षकांसमोर जाणार आहे. अशात तिची ही इमेज प्रेक्षकांच्या पचनी पडावी म्हणून पप्पा शक्ती कपूर यांनीच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 



बॉम्बे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शक्ती नेहमीच श्रद्धाचा चित्रपट दिल्ली येथे बघतात. त्यांच्या मते, जेव्हा ते दिल्लीत श्रद्धाचा चित्रपट बघतात, तेव्हा तो चित्रपट जबरदस्त हिट होतो. आतापर्यंत शक्ती यांनी श्रद्धाचे ‘आशिकी-२’ आणि ‘एक विलेन’ हे दोन चित्रपट दिल्लीत बघितले आहेत. आश्चर्य म्हणजे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. तर अखेरीस रिलीज झालेले श्रद्धाचे दोन चित्रपट शक्तीला दिल्लीत जाऊन बघता आले नसल्याने, ते फ्लॉप ठरले. आता तुम्ही यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू परंतु शक्तीचा हा अंधविश्वास मुलीचा चित्रपट हिट करण्याचा फॉर्म्युला ठरत आहे. 

त्यामुळे आगामी ‘हसीना’ हा चित्रपट हिट ठरावा म्हणून शक्ती दिल्लीला जाऊन चित्रपट बघण्याची तयारी करीत आहेत. आता शक्तीचा हा अंधविश्वास यावेळी कितपत सार्थकी लागेल हे बघणे मजेशीर ठरणार आहे. तर श्रद्धाविषयी सांगायचे झाल्यास ती दोन बायोपिक करणार आहे. एक म्हणजे ‘हसीना’ व दुसरा ‘सायना नेहवाल’ हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये ती काम करताना बघावयास मिळणार आहे. दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे असल्याने त्यादृष्टीने श्रद्धाला तयारी करावी लागणार आहे. 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :