दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने भडकणार तर नाही ना रणवीर?

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’नाही, ही खबर तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज असल्याचे कळतेयं. आता या नाराजीत आणखी भर पडण्याची भीती आम्हाला सतावतेय.

दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने  भडकणार तर नाही ना रणवीर?
Published: 19 Oct 2016 06:08 PM  Updated: 19 Oct 2016 12:38 PM

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’नाही, ही खबर तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज असल्याचे कळतेयं. आता या नाराजीत आणखी भर पडण्याची भीती आम्हाला सतावतेय. होय, दीपिका व शाहीद कपूर यांचा twitterवर रंगलेला संवाद बघून रणवीर नाराज होऊ शकतो. दीपिकाने अलीकडे सलमानच्या ‘बिग बॉस’मध्ये ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या तिच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लॉन्च केले. या ट्रेलरमध्ये दीपिका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात आहे. या ट्रेलरनंतर दीपिकावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. शाहीदनेही हा ट्रेलर पाहिला आणि त्याने लगेच दीपिका twitterवर शुभेच्छा दिल्या. ‘ट्रिपल एक्समधील तुझा अभिनय बघून मला तुझा अभिमान वाटतोय...’असे शाहीदने म्हटले. शाहीदच्या या tweetला दीपिकाने लगेच उत्तर दिले. तिने केवळ शाहीदचे आभारच मानले नाहीत तर त्याला ‘साशा’(शाहीदचे निकनेम) असे संबोधले. शिवाय तीन ‘किस’ करणा-या ‘इमोजी’ही पाठवल्या. आता या ‘किस’ करणा-या ‘इमोजी’पाहून रणवीर भडकू नये म्हणजे झाले...!!


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :