‘आयपीएल’च्या सट्टेबाजारात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे गुंतले हात?

​अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर ‘आयपीएल’वर सट्टा लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

‘आयपीएल’च्या सट्टेबाजारात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे गुंतले हात?
Published: 14 May 2017 07:57 PM  Updated: 14 May 2017 07:57 PM

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर ‘आयपीएल’वर सट्टा लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कानपूर येथील लॅण्डमार्क हॉटेलमध्ये पकडण्यात आलेल्या सट्टेबाजांची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख केला गेल्याची माहिती आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत याविषयीची खात्रीशीर माहिती समोर आली नसली तरी, पोलीस सध्या एक-एक धागा जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अनेक बॉलिवूड तारे-तारकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. 

सध्या आयपीएलचा सिजन १० भरात आला असून, लवकरच फायनलचा सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे सध्या सट्टेबाजाराला ऊत आला असून, यामध्ये बºयाचशा बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी कानपूर येथील लॅण्डमार्क हॉटेलमध्ये थांबलेल्या एका सट्टेबाजाने अचानक आपली रूम बदलल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. जेव्हा क्राइम ब्रॅँचच्या टीमने याबाबतचा तपास केला तेव्हा हॉटेलमधील रूम नंबर १२२५ एका अभिनेत्रीच्या नावे बुक केला जाणार होता, अशी माहिती समोर आली. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करीत असून, या अभिनेत्रीचे संबंधित सट्टेबाजाशी काही संबंध तर नाही ना? याविषयीचा तपास करीत आहे. पोलीस अधीक्षक पूर्वी अनुराग आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल व्यवस्थापकांची चौकशी सुरू असून, हा योगायोग तर नाही ना? याचीही शक्यता पडताळली जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ८ मे रोजी नयन रमेश आणि विकास चौहान हे दोन सट्टेबाज शहरात दाखल झाले होते. त्यांनी हॉटेल लॅण्डमार्क येथे बाराव्या मजल्यावरील १२२५ क्र्रमांकाची रूम बुक केली. या फ्लोअरवर गुजरात लायन्स टीमचे खेळाडू होते. त्यानंतर अचानकच ९ मे रोजी या दोन्ही सट्टेबाजांनी रूम बदलली. त्यांनी हॉटेलच्या १७ व्या मजल्यावरील १७३३ क्रमांकाची रूम बुक केली. ही रूम गुजरात लायन्स टीमच्या कॉन्फ्रंस हॉलच्या अगदीच शेजारी होती. या हॉलमध्ये बसून टीमचे व्यवस्थापक तथा खेळाडू मॅचचे प्लॅनिंग करीत असत. 

यावरून हॉटेल व्यवस्थापकांनी सांगितले की, हॉटेलमधील १२ व्या मजल्यावरील १२२५ क्रमांकाची रूम बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली जाणार होती. त्यामुळेच नयन रमेशला १७ व्या मजल्यावरील १७३३ क्रमांकाच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. २५ एप्रिल रोजीदेखील हे दोघेही सट्टेबाज शहरात थांबलेले होते. तेव्हाही दोघे हॉटेल लॅण्डमार्क येथेच मुक्कामी होते. त्याचवेळी त्यांनी काही खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ते यशस्वी ठरल्याचेही समजते. तर दुसरीकडे ज्या अभिनेत्रीवर सट्टेबाजीचा संशय व्यक्त केला जात आहे, त्याच अभिनेत्रीवर राजस्थान क्रिकेट टूर्नामेण्टमध्येही सट्टेबाजी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र अद्यापपर्यंत या अभिनेत्रीचे नाव स्पष्ट होऊ शकले नसल्याने पोलिसांनी याविषयी अधिक माहिती देणे योग्य समजले नाही. दरम्यान, ‘आयपीएल’ यापूर्वीदेखील वादाच्या भोवºयात सापडले होते. आता पुन्हा एकदा अशाप्रकारचे आरोप केले जात असल्याने फायनलमध्ये सट्टेबाजीला ऊत येईल, यात शंका नाही. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :