OMG : ​बॉलिवूड स्टार्सना आहेत 'या' चांगल्या-वाईट सवयी !

सेलिब्रिटींनाही चांगल्या सवयींप्रमाणेच काही वाईट सवयीदेखील असतात. जाणून घेऊया त्यांच्या वाईट सवयींबाबत...

OMG : ​बॉलिवूड स्टार्सना आहेत 'या' चांगल्या-वाईट सवयी !
Published: 22 Mar 2018 05:43 PM  Updated: 22 Mar 2018 05:43 PM

-रवींद्र मोरे 
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लाइफस्टाइलचे आकर्षण सर्वांनाच असते. ते काय करतात, काय खातात, दिवसाची सुरूवात कधी करतात, कधी झोपतात, कोणाला डेट करतात आदी बाबतीत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूपच धावपळ करतात. मात्र आपण हे विसरतो की, सेलिब्रिटीदेखील आपल्यासारखेच मनुष्य आहेत. आम्हाला जशा काही वाईट सवयी असतात, त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनाही चांगल्या सवयींप्रमाणेच काही वाईट सवयीदेखील असतात. जाणून घेऊया काही सेलिब्रिटींच्या चांगल्या वाईट सवयींबाबत... 

Image result for Bad habits of kareena

* करिना कपूर खान
बॉलिवूड बेबो करिना कपूरचे सौंदर्य एका मुलाला जन्म दिल्यानंतरही जैसे थे आहे. तिच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेण्यासाठी जवळपास सर्वच तरुणी उत्सुक असतात. मात्र बॉलिवूडच्या या बेबोला नखे कुरतडण्याची वाईट सवय आहे, हे आपणास माहित आहे का? हो हे खरे आहे. करिना कपूर नखे कुरतडण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही.  

Related image

* जॉन अब्राहम
बॉलिवूड हॅँडसम हंक जॉन अब्राहममध्ये एक चांगली सवय म्हणजे तो स्वत:ला नेहमी अपडेट ठेवतो, त्यातच तो स्वत:च्या फिटनेससाठी खूप मेहनतही घेतो. मात्र आपल्या लाडक्या जॉनला स्वत:च्या पायांना सतत हलविण्याची वाईट सवय आहे. विशेष म्हणजे त्याच्या या सवयीमुळे त्याचे कुटुंब तर नाराज आहे शिवाय त्याचे मित्रही खूपच त्रस्त आहेत.  

Image result for Bad habits of vidya balan

* विद्या बालन  
बेगम जान विद्या बालनच्या सौंदर्याने तिचे चाहते आजही घायाळ होतात. तिच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी आजच्या तरुणी खूपच उत्साही आहेत, मात्र आपल्या विद्याला एक अशी वाईट सवय आहे ज्यामुळे बरेच महत्त्वाची कामे जसे इव्हेंट्स मिस करते. विद्याला सेटवर फोन वापरणे आवडत नाही, ज्यामुळे ती आपला मोबाइल चेक करत नाही. मात्र नेमके याच कारणाने तिचे महत्त्वाचे कामे मागे पडतात किंवा मिस होतात. 

 Image result for Bad habits of priyanka

* प्रियांका चोप्रा
देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या चांगल्या सवयींद्वारे स्वत:ला मेंटेन ठेवले आहे. याच जोरावर तिने थेट हॉलिवूडमध्येही मजल मारली आहे. मात्र आपली लाडकी प्रियांकाला संताप जरा जास्तच येतो. विशेष म्हणजे तिच्या रुममधल्या वस्तू कोणी अस्ताव्यस्त केल्या तेव्हा जरा ती जास्तच भडकते आणि संतापात तो रुम आहे त्या स्थितीत सोडून बाहेर पडते. तिच्या या वाईट सवयीने तिच्या कुटुंबाला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. 

Image result for Bad habits of sushmita

* सुष्मिता सेन  
बॉलिवूडची मिस वर्ल्ड सुष्मिता सेनच्या सौंदर्याचे तर आजही सर्वचजण चाहते आहेत. एवढ्या वयातही सुष्मिताने स्वत:ला फिट ठेवले आहे. मात्र सुष्मिताला खुल्या आकाशाखाली चांदण्यांच्या सावलीत अंघोळ करणे आवडते. यासाठी तिने आपला बाथटब घराच्या छतावरदेखील ठेवला आहे.  

 Image result for shahrukh

* शाहरुख खान  
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसारखे दिसणे कोणाला आवडणार नाही. बहुतांश तरुणाई त्याच्यासारखे दिसण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. त्याचा चष्मा, हेअरस्टाइल, त्याचे कपडे त्यात त्याची जीन्स आदींचे कित्येकजण अनुकरण करतात. त्यानुसार वरील वस्तू खूप पैसेदेऊन खरेदीही करतात, मात्र आपणास कदाचित माहित नसेल की, शाहरुखला खूपच साधारण जीन्स परिधान करण्याची सवय आहे. विशेष म्हणजे त्याच्याजवळ खूप कमी किमतीच्या जीन्स आहेत आणि त्या तो परिधानही करतो.  

Image result for shahid kapoor drink tea

* शाहिद कपूर   
आपला अभिनय शिवाय स्टायलिश लाइफस्टाइल आदी कारणाने शाहिद कपूर बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र असे म्हटले जाते की, हा चॉकलेट बॉय कॅफिनच्या सवयीने ग्रस्त आहे. यामुळे शाहिद मोठ्या प्रमाणात कॉफीचे सेवन करतो. तो दिवसभरातून सुमारे १० कप कॉफी पित असल्याचे समजते.   


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :