Phillauri Promotion : अनुष्का शर्माचा ‘लहंगा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

अनुष्काचा असाच एक ‘लहंगा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सकडून या व्हिडीओला चांगलेच पसंत केले जात आहे.

Phillauri Promotion : अनुष्का शर्माचा ‘लहंगा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Published: 13 Mar 2017 04:04 PM  Updated: 13 Mar 2017 04:04 PM

सध्या सोशल मीडिया आणि अनुष्का शर्मा जणूकाही समीकरणच बनले आहे. कारण दर दिवसाला अनुष्काशी संबंधित एकतरी व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर धूम उडवित आहे. सध्या अनुष्काचा असाच एक ‘लहंगा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सकडून या व्हिडीओला चांगलेच पसंत केले जात आहे. 

व्हिडीओमध्ये अनुष्का ही लहंगा परिधान करून पुढे चालत असून, तिच्या मागे कोणीतरी तिचा पदर धरून चालत आहे. तिच्या चालण्याचा अंदाज शाही असा आहे. व्हिडीओ बघून असे वाटत आहे की, अनुष्का एखाद्या सिनेमाच्या सेटवर जात आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘साहिबा चली जहा वहॉँ मिर्झा’ वास्तविक हे गाणे अनुष्काच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमातील आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये हेच गाणे सुरू होते. या व्हिडीओला केवळ पाच तासात साडेतीन लाखांपेक्षा अधिक वेळा बघितले गेले. तर ५५० पेक्षा अधिक कमेंट दिल्या. 
 

 

#Sahiba chali jahan Mirza ... #Phillauri

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


अनुष्काच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाचे आतापर्यंत तीन गाणे रिलीज करण्यात आले आहेत. त्यात पहिले रोमॅण्टिक दुसरे लग्नातील मस्ती मूड तर तिसरे ‘गम’वर आधारित आहे. जुन्या गाण्यांच्या संगीताचा बाझ असलेले हे गीत खूपच श्रवणीय आहे. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात आलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने धूम उडवून दिली होती. शिवाय आतापर्यंत रिलीज करण्यात आलेली सर्व गाणी प्रेक्षकांना आवडली आहेत. 

त्यामुळे हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनुष्काने अनेक फंडे वापरले आहेत. जगभरातील विविध आयकॉनीक वस्तू, घटना तसेच सिनेमांच्या फोटोंमध्ये स्वत:चा फोटो एडिट करून तो ती सोशल मीडियावर शेअर करीत असे. अनुष्काचा हा प्रमोशन फंडा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. सिनेमात अनुष्का भुताच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :