बच्चन कुटुंबातील ‘कजरारे’ जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर

आगामी हॅप्पी एनिव्हर्सरी या चित्रपटात अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्या एकत्र पाहयला मिळू शकतात. मात्र अद्याप यावर निश्चिती व्हायची आहे

बच्चन कुटुंबातील ‘कजरारे’ जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर
Published: 28 Feb 2017 08:51 PM  Updated: 28 Feb 2017 09:38 PM

महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. रिल लाईफमधील अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी सुपरहिट असून रिअल लाईफमध्ये या जोडीचे अनेक चाहते आहेत. ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अभिषेक  व ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, गुरू, सरकार राज, धूम २ आणि रावण यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बंटी और बबली या चित्रपटातील ‘कजरारे’ या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक केल आहेत. आजही हे गाणे त्यांच्या चाहत्यांना आवडते. मात्र २०१० पासून या सुपरहिट जोडीचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. दरम्यान अभिषेक  व ऐश्वर्याने वेगवेगळ्या चित्रपटात भूमिका केल्या होता. मागील वर्षी रिलीज झालेला ऐश्वर्या राय बच्चन हिचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 



असे सांगण्यात येते की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी ‘गुलाब जामून’ या चित्रपटात बच्चन कुुटुंबीयातील सदस्य एकत्र येऊ शकतात. या चित्रपटाची निर्मिती अनुराग करीत असून दिग्दर्शनाची जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र या चित्रपटासाठी दोघांनी अद्याप होकार दिला नसल्याचे समजते. 

दुसरीकडे बंटी व बबली नंतर बच्चन कुुटुंबीयांचे त्रिकूट पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणात असल्याचे समजते. दिग्दर्शक गौरांग दोशीच्या आगामी हॅप्पी एनिव्हर्सरी या चित्रपटात अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्या एकत्र पाहयला मिळू शकतात. मात्र अद्याप यावर निश्चिती व्हायची आहे. २००८ साली आलेल्या सरकार राजमध्ये बच्चन त्रिकूट एकत्र आले होते. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने बच्चन कुुटुंबीय एकाच चित्रपटात एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. आशा क रूया चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. 



पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :