अजय देवगणचा मुलगा युगसोबतचा हा सुंदर फोटो तुम्ही बघितला काय?

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण ९०च्या दशकातील असा कलाकार आहे, ज्याने कधीही आपल्या परिवाराला सार्वजनिक करण्यास फारसे स्वारस्य दाखविले नाही.

अजय देवगणचा मुलगा युगसोबतचा हा सुंदर फोटो तुम्ही बघितला काय?
Published: 14 Apr 2017 04:35 PM  Updated: 14 Apr 2017 04:36 PM

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण ९०च्या दशकातील असा कलाकार आहे, ज्याने कधीही आपल्या परिवाराला सार्वजनिक करण्यास फारसे स्वारस्य दाखविले नाही. मात्र गेल्या काहीकाळापासून त्याच्यात प्रचंड बदल झाला असून, तो प्रोफेशनल लाइफबरोबरच पर्सनल लाइफदेखील त्याच्या फॅन्सबरोबर शेअर करताना दिसत आहे. आता अजयने चक्क मुलगा युगचा एक सुंदरसा फोटो शेअर केला असून, त्याच्या फॅन्सने कधीच बघितला नसेल असा हा फोटो असल्याचे सध्या बोलले जात आहे. 

खरं तर ‘शिवाय’च्या रिलीजपासून अजय सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. दररोज तो त्याचे फोटोज् आणि व्हिडिओज् त्याच्या फॅन्सबरोबर शेअर करीत असतो. आज त्याने मुलगा युगबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अजयने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले आहे, तर मुलगा पांढºया रंगाच्या शर्टमध्ये आहे. अजयने आपल्या मुलाला मिठीत घेतलेले असल्याने दोघांची ही मोमेंट खूपच क्युट आहे. 

त्याचबरोबर युगचा हा फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, तो अजयवर नव्हे तर आई काजोलवर गेल्याचे स्पष्टपणे दिसते. अजयने १९९९ मध्ये ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिच्याशी विवाह केला. या कपलला न्यासा आणि युग नावाची मुले आहेत. काही दिवसांपूर्वीच अजयच्या मुलीचे काही फोटोज् सोशल मीडियावर बघावयास मिळाले होते. आता अजयच्या मुलाचा फोटो समोर आला आहे. 

वास्तविक युगचा अद्यापपर्यंत एकही फोटो समोर आलेला नाही. अशात या फोटोमुळे अजयच्या फॅन्समध्ये जणू काही उत्साहच निर्माण झाला आहे. सध्या अजय त्याच्या आगामी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा फोटो ‘गोलमाल अगेन’च्या सेटवरीलच असावा. 


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :