अंजली पाटीलने रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाविषयी केला मोठा खुलासा!

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटात काम करण्याबाबतचा अंजलीने एक मोठा खुलासा केला आहे.

अंजली पाटीलने रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाविषयी केला मोठा खुलासा!
Published: 11 Oct 2017 04:12 PM  Updated: 11 Oct 2017 04:12 PM

मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. अंजलीचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करला पाठविल्यानंतर अंजली जबरदस्त लाइमलाइटमध्ये आली आहे. त्यातच ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करीत असल्याने अंजलीचे नशीब ‘सातवे आसमान पे’ असेच म्हणावे लागेल. असो, अंजलीने तिच्या आगामी तामीळ ‘काला’ या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केले. अंजलीने म्हटले की, ‘काला या चित्रपटात काम करण्यास केवळ याकरिता होकार दिला की, यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भूमिका आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा आपण भाग बनत आहोत, याच विचाराने मी या चित्रपटाला होकार दिला आहे. 

चित्रपटात अंजली एक प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. पा. रंजीत दिग्दर्शित या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत एका दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, अंजलीने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘जेव्हा मी चित्रपटासाठी करार केला तेव्हा मला माहीत होते की, हा तो चित्रपट नाही, ज्यामध्ये मला माझ्यातील योग्यता सिद्ध करावी लागणार आहे. मी केवळ रजनीकांत यांची भूमिका असलेल्या चित्रपटाचा आपण एक भाग बनत असल्याच्या उत्साहाने चित्रपटाला होकार दिला आहे. या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा मला अनुभव घ्यायचा होता, असेही अंजलीने सांगितले. 



सुपरस्टार रजनीकांतसोबतच्या काम करण्याच्या अनुभवाविषयी अंजलीने म्हटले की, ‘हे परीकथेप्रमाणे आहे. ते खूपच चांगले आहेत. तुम्ही अशा लोकांना केवळ परीकथेमध्येच बघू शकता. त्यांचा आजूबाजूला राहणाºया सर्व लोकांना सहवास हवाहवासा आहे. त्यामुळे तामीळ इंडस्ट्रीचा भाग बनल्याचा सध्या मी आनंद घेत असल्याचे अंजली म्हणाली. दरम्यान, ‘काला’ या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत, अंजली पाटील यांच्यासह नाना पाटेकर, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी आणि समुथिरकनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती धनुष करीत आहे. 


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :