‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रियंका गांधी यांची भूमिका!!

वादग्रस्त पुस्तकावर आधारित ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातील कास्टबद्दल एक माहिती समोर येत असून, या चित्रपटात प्रियंका गांधी यांची भूमिका ही अभिनेत्री साकारणार आहे.

‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रियंका गांधी यांची भूमिका!!
Published: 18 Mar 2018 06:37 PM  Updated: 18 Mar 2018 06:37 PM

हंसल मेहता यांचा ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची शूटिंग येत्या ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत, तर अक्षय खन्ना संजय बारूंच्या भूमिकेत बघावयास मिळेल. दरम्यान, या चित्रपटातील एका नव्या पात्राबद्दलची माहिती समोर आली असून, ते पात्र प्रियंका गांधी यांचे आाहे. 



होय, प्रियंका गांधी यांची भूमिका आहना कुमारी साकारताना बघावयास मिळणार आहे. आहना ‘लिपस्टिक अंडर माय बुरका’ या चित्रपटात यापूर्वी बघावयास मिळाली आहे. चित्रपटात आहना प्रियंका गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटासाठी आहनाचा लूक पूर्णपणे ट्रान्सफार्मेशन केला आहे. चित्रपटाची कथा हंसल मेहता यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीवरून बराचसा वाद निर्माण झाला होता. 
 


दरम्यान, चित्रपटाला सुनील बोहरा प्रोड्युस करीत आहेत. याअगोदर त्यांनी ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’ आणि ‘साहेब बीवी और गॅँगस्टर’ यांसारखे चित्रपट प्रोड्युस केले आहेत. संजय बारू २००४  ते २००८ दरम्यान तत्कालीन पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार होते. त्यांनी माजी पंतप्रधानांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा खुलासा केला. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनाअगोदरच चर्चेत राहण्याची शक्यता आहे. विजय रत्नाकर गुट्टा चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :