SHOCKING : ​आपल्या लाडक्या ‘या’ ८ अभिनेत्री लग्नाअगोदर होत्या प्रेग्नंट !

बॉलिवूडमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाअगोदर प्रेग्नंट होत्या, जाणून घेऊया त्यांच्याबाबत.

SHOCKING : ​आपल्या लाडक्या ‘या’ ८ अभिनेत्री लग्नाअगोदर होत्या प्रेग्नंट !
Published: 14 Jun 2017 01:17 PM  Updated: 14 Jun 2017 01:17 PM

आपल्याला माहिती आहेच की, बॉलिवूडमध्ये जे काही घडते ते काही काळानंतर बाहेर व्हायरल होतेच. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्रींचे अफेर्स तर सोडाच त्यांचे अनैतिक संबंधही लपलेले राहत नाही. हॉलिवूडमध्ये या गोष्टी सामान्य आहेत, मात्र बॉलिवूडमध्येही अशा काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाअगोदर प्रेग्नंट होत्या. जाणून घेऊया त्यांच्याबाबत. 

Image result for sridevi baby bump
* श्रीदेवी
श्रीदेवी लग्नाअगोदरच प्रेग्नंट होती. विशेष म्हणजे तिने ही गोष्टी स्वत:च मीडियाला जाहीर केली होती. तिचे अफेर बोनी कपूरसोबत सुरु होते. जेव्हा ती प्रेग्नंट असल्याचे समोर आले तेव्हा बोनी कपूर विवाहित होते. नंतर बोनी कपूरने पत्नी मोना कपूर (अर्जून कपूरची आई)पासून घटस्पोट घेतला. आणि १९९६ मध्ये श्रीदेवीशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनीच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.

Image result for mahima chaudhary pregnant
* महिमा चौधरी
'परदेस', 'दिल क्या करे', 'लज्जा', 'धड़कन', 'दिल है तुम्हारा' यासारखे यशस्वी चित्रपटात काम केल्यानंतर महिमा चौधरीने २००६ मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. जेवढ्या लवकर तिने लग्नाचा निर्णय घेतला तेवढ्याच लवकर तिच्या प्रेग्नंट असण्याच्या बातम्यादेखील येऊ लागल्या. महिमाने मुंबईचे आर्किटेक्ट बॉबी चौधरीसोबत २००६ मध्ये लग्न केले आणि काही महिन्यानंतरच एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे ती प्रेग्नंट असल्याचे तिने कुणालाही कळू दिले नव्हते. 

Related image
* कोंकणा सेन शर्मा
कोंकणा सेन शर्माने सप्टेंबर २०१० मध्ये तिचा बॉयफ्रेंड रणवीर शौरीसोबत लग्न केले होते. विशेष म्हणजे लग्नानंतर काही वेळातच दोघांनी आम्ही लवकरच आई-वडिल होणार असल्याचे जाहीर केले. १५ मार्च २०११ रोजी कोंकणा सेन शर्माने एका मुलाला जन्म दिला. सध्या हे कपल वेगवेगळे राहत आहेत. 

Related image
* वीना मलिक
वीना मलिकने २५ डिसेंबर, २०१३ रोजी दुबई बेस्ड बिजनेसमॅन असद बशीर खान यांच्याशी लग्न केले आणि सप्टेंबर २०१४ ला पहिला मुलगा अबरामला जन्म दिला. यावरुन समजते की, वीना मलिक लग्नाअगोदर प्रेग्नंट होती.

Related image
 * सारिका
साउथचे सुपरस्टार कमल हासनने आपली पत्नी वानीशी घटस्पोट घेऊन सारिकासोबत राहू लागले होते. काही काळानंतरच सारिका प्रेग्नंट असल्याचे वृत्त समोर आले. २८ जानेवारी १९८६ रोजी श्रुति हासनचा जन्म झाला. श्रुतिच्या जन्माच्या दोन वर्षानंतर १९८८ मध्ये सारिका आणि कमलने लग्न केले. १९९१ मध्ये सारिकाने पुन्हा आपली दुसरी मुलगी अक्षराला जन्म दिला. 

Related image
* सेलिना जेटली
ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सेलिना जेटलीदेखील लग्नाअगोदर प्रेग्नंट असल्याचे वृत्त होते. २०११ मध्ये पीटर हॉगसोबत लग्न करण्याच्या आठ महिन्यानंतरच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. यामुळे ती लग्नाअगोदरच प्रेग्नंट असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. 

Related image 
* नीना गुप्ता
अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या अफेरच्या बातम्या अगोदरपासूनच चर्चिल्या जात होत्या. अशातच नीना प्रेग्नंट असल्याच्या बातमीने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. १९८९ मध्ये नीनाने मसाबा मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे त्यानंतर तिने सिंगल मदर म्हणूनच मुलीचा सांभाळ केला. 

Image result for * अनुष्का शंकर pregnant
* अनुष्का शंकर
प्रसिद्ध सितारवादक आणि म्युझिशियन अनुष्का शंकरदेखील लग्नाअगोदर प्रेग्नंट होती. तिने आपला बॉयफे्रेंड आणि ब्रिटिश फिल्म मेकर जो राइटसोबत २६ सप्टेंबर २०१० रोजी लग्न केले आणि पाच महिन्यानंतरच म्हणजे २२ फेब्रुवारी २०११ रोजी अनुष्काने जुबिन शंकर राइट या मुलाला जन्म दिला होता.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :