महेश बाबूच्या सुपरहिट ‘स्पायडर’चा सिनेमाचा या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर!

बॉलिवूडमध्ये आमीर खानचा गजनी आणि सोनाक्षी सिन्हाचा अकिरा हे सिनेमे बनवणारे अतिशय कल्पक दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी हा सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शितही केला आहे. हा सिनेमा म्हणजे रहस्य, अॅक्शन आणि घडामोडींनी भरलेली मनोरंजनाची वेगळी आणि मस्त भेळ आहे. १७ जूनला रात्री नऊ वाजता स्पायडरचा प्रीमियर होणार आहे.

महेश बाबूच्या सुपरहिट ‘स्पायडर’चा सिनेमाचा या तारखेला होणार वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमिअर!
Published: 12 Jun 2018 12:10 PM  Updated: 12 Jun 2018 12:10 PM

एका गुप्तहेर संघटनेच्या अधिकाऱ्याला जगण्याच्या आणि लढण्याच्या खूप मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं जेव्हा त्याच्यावर त्याच्या शहराला एका मनोविकारी खुण्यापासून वाचवण्याची वेळ येते.तेलुगु सुपरस्टार महेश बाबू याची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा दोन भाषेत बनत असून हा सिनेमा त्याचं तमिळमधील पदार्पण आहे.यात रकूल प्रीत सिंग व एस जे सूर्या या खलनायकी भूमिका आहेत.बॉलिवूडमध्ये आमीर खानचा गजनी आणि सोनाक्षी सिन्हाचा अकिरा हे सिनेमे बनवणारे अतिशय कल्पक दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी हा सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शितही केला आहे. हा सिनेमा म्हणजे रहस्य, अॅक्शन आणि घडामोडींनी भरलेली मनोरंजनाची वेगळी आणि मस्त भेळ आहे. १७ जूनला रात्री नऊ वाजता स्पायडरचा प्रीमियर होणार आहे.

या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवा अर्थात महेश बाबू यांचा दणकेबाज अभिनय.महेश बाबू पडद्यावर फक्त देखणे दिसतच नाहीत तर त्यांनी आपली भूमिकाही अतिशय ऐटीत पार पाडली आहे.शिवाच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे रकुल प्रीत सिंग आणि भैरावूडूच्या भूमिकेत आहे एस जे सूर्या, ज्याची ह्या सिनेमात भूमिका हॉलीवूड सिनेमांमधील मनोविकृतांच्या भूमिकांवर आधारित आहे.त्याचं गुंगवून टाकणारं काम त्याच्या पात्राला अधिकच घनपणा देतात आणि प्रेक्षकांना क्षणाचीही उसंत मिळवू देत नाहीत. उत्तम कलाकारांच्या ह्या फौजेबरोबरच स्पायडरमधील इतर खास वैशिष्ट्य आहेत त्याची सुंदर दृश्यात्मकता, सुंदररीत्या चित्रित केलेली गाणी आणि भव्यदिव्य अॅक्शन सिन्स.शिवा (महेश बाबू), एक गुप्तहेर संघटनेचा अधिकारी, एक असं सॉफ्टवेअर बनवतो जे मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांना शोधून काढते. ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तो गुन्हेगारांना पकडतो आणि तेही बऱ्याचदा ते गुन्हा करायच्या आधीच.एके दिवशी शिवाला एका तरुण मुलीचा फोन येतो आणि तो लगेचच एका स्त्री पोलिसाला तिच्या मदतीसाठी पाठवतो.अनपेक्षितरीत्या, दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचा आणि स्त्री पोलिसाचा खून होतो.तपास केल्यावर शिवाच्या असं ध्यानात येतं की हा गुन्हा सिरीयल किलर भैरवाने (एस जे सूर्या) केला आहे. भैरवा हा कथेच्या मुख्य पात्राच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा असून, तो एक वाईट, विघ्नसंतोषी मनुष्य आहे ज्याला लोकांच्या वेदना बघून आनंद होतो.जेव्हा भैरवच्या हे लक्षात येतं की शिवाने त्याला ओळखलं आहे, तो एक अधिक मोठा गुन्हा करायचं ठरवतो. आणि मग सुरु होतो उंदीर मांजराचा थरारक खेळ.        

RELATED ARTICLES


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :