भाऊ-बहिणीत कोण सरस ?

बॉलिवूडमधील अनेक भाऊ-बहिणींच्या जोडीने चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र यापैकी सगळ्यांचा आपल्या करिअरमध्ये यश मिळवता आले नाही आहे.

भाऊ-बहिणीत कोण सरस ?
Published: 18 May 2017 06:04 PM  Updated: 18 May 2017 06:06 PM

आपल्या करिअरमध्ये प्रत्येकाजण यशस्वी होतच असे नाही. काहींना आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळत तर काहीजणांना शेवटपर्यंत यश मिळवण्यासाठी स्ट्रगल करावे लागते. बॉलिवूड ही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्यात आहेत. ज्यापैकी एकजण आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहे तर दुसराजण यश मिळवण्यासाठी आज संघर्ष करताना दिसतेय. यापैकी अनेक जणांनी एकत्र चित्रपटांमध्ये कामदेखील केले आहे. एक नजर टाकूया अशाच काही भाऊ-बहिणींच्या जोड्यांवर.. 


शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी 
शिल्पा शेट्टी और शमिता शेट्टी यांनी अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. 2002मध्ये आलेल्या फरेब चित्रपटात त्या एकत्र दिसल्या होत्या. शिल्पाने 1993 साली आलेल्या बाजीगर चित्रपटातून एंट्री केली तर शमिताने 'मोहब्बते' मधून डेब्यू केले. चित्रपटसृष्टी आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात शिल्पा यश आले मात्र शमिता याबाबतीत अयशस्वी ठरली. शिल्पा आजही बॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्रींमध्ये मोजली जाते तर शमिता आजही सक्सेस मिळवण्यासाठी स्ट्रगल करताना दिसतेय. 
सनी देओल और बॉबी देओल
सनी आणि बॉबी देओल याजोडीने अपने, यमला पगला दिवाना या चित्रपटात एकत्र झळकले होते. सनी देओलचे बॉलिवूड करिअर यशस्वी झाले तर बॉबीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे यश मिळवता आले नाही. सनीने आपल्या करिअरमध्ये घायल, बॉर्डर, दामिनी, गदर एक प्रेमकथा असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. बॉबीने बरसात या चित्रपटाव्दारे इंटस्ट्रीत पदार्पण केले खरे आणि हा चित्रपटदेखील हिट झाला मात्र बॉबीचे करिअर फ्लॉपच राहिले. त्याचा सोल्जर, बादल. बिच्छू आणि अजनबी असेच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत चित्रपट प्रक्षकांच्या लक्षात राहिले.  
सलमान खान आणि अरबाज खान 
सलमान खान आणि अरबाज खानच्या जोडीने हॅलो ब्रदर, प्यार किया तो डरना क्या, दबंगसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. सलमान खान या हे आज बॉलिवूड इंडस्ट्रीतली महत्त्वाचे नाव आहे. सलमानचा करिअरचा ग्राफ मैंने प्यार किया पासून अलिकडे आलेल्या एक था टायगरपर्यंत नेहमीच चढता राहिला. तर अरबाजला मात्र अभिनयक्षेत्रात आपली वेगळी जागा निर्माण करता आली नाही. त्यानंतर मात्र अरबाजने आपल्या मोर्चा निर्माती क्षेत्राकडे वळवला.  आमिर खान आणि फैजल खान 
आमिर खान आणि फैजल खानने  'मेला' या 2000 साली आलेल्या चित्रपटात एकत्र काम केले होत. आमिरला आज बॉलिवूडमध्ये मीस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखतात. तर फैजलला आज ही फारसे लोक ओळखत नाहीत. फैजल काही मोजक्याच चित्रपटांत झळकला आणि ते चित्रपट ही फ्लॉप ठरले. बॉलिवूडमधले अनेक हिट चित्रपट आमिरच्या नावावर आहेत. गेल्या काही वर्षांपासून हिट चित्रपट आणि आमिर खान असे जणू काही समीकरणच झाले आहे.   

 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :