अनिल कपूरला बघताच सनी देओलचा व्हायचा संताप; सेटवरच दाबला होता गळा!

सनी देओलला अनिल कपूरचा ऐवढा राग येत होता की, ‘जोशीले’च्या सेटवर त्याने अनिलचा चक्क गळा दाबला होता.

अनिल कपूरला बघताच सनी देओलचा व्हायचा संताप; सेटवरच दाबला होता गळा!
Published: 22 Aug 2017 05:31 PM  Updated: 22 Aug 2017 05:31 PM

सनी देओलचे नाव समोर येताच आपल्या डोक्यात त्याच्या अनेकप्रकारच्या छबी निर्माण होतात. ‘घायल, घातक, दामिनी, गदर आणि इंडियन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा सनीपाजी त्याच्या डॅशिंग अंदाज आणि डायलॉग्ससाठी ओळखला जातो. पडद्यावर भलेही सनीपाजीचा रागीट स्वभाव दिसत असला तरी रिअल लाइफमध्ये तो खूपच शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. शिवाय तो कामाशी काम ठेवणारा कलाकार आहे. सुरुवातीपासूनच त्याला कोणासोबतही जास्त जवळीकता निर्माण करायला आवडत नाही. मात्र त्याच्या जीवनात एक घटना अशीही घडली होती जेव्हा तो शूटिंगदरम्यान त्याच्या सहकलाकारावर प्रचंड भडकला होता. हा सहकलाकार दुसरा-तिसरा कोणीही नसून अभिनेता अनिल कपूर हा होता. 

अनिल कपूर याने सनीपाजीबरोबर ‘राम-अवतार’ आणि ‘जोशिले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८९ मध्ये आलेल्या ‘जोशिले’ याच चित्रपटादरम्यानचा हा किस्सा घडला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले ज्यामुळे सनीपाजी खूपच त्रस्त झाला होता. त्यावेळी सनी देओलच्या तुलनेत अनिल कपूरचे नाव मोठे होते. त्यामुळे बॉलिवूड नियमाप्रमाणे चित्रपट सुरू होण्याअगोदर मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव अगोदर दाखविले जाते. हीच बाब सनीपाजीला खटकली होती. जेव्हा चित्रपटाच्या के्रडिटमध्ये अनिल कपूरचे नाव सनी देओलच्या अगोदर टाकण्यात आले तेव्हा सनी देओलच्या रागाला पारावार उरला नव्हता. त्याने निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्याचवर्षी सनी आणि अनिल कपूर यांचा ‘राम-अवतार’ हा चित्रपटदेखील येणार होता. मात्र मध्येच त्यांच्यातील नात्यात दरार निर्माण झाली होती. अशातही दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव सनीने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. शूटिंगदरम्यान दोघेही त्यांचा-त्यांचा शॉट देऊन मेकअप रूममध्ये निघून जायचे. स्टारडस्टच्या वृत्तानुसार, एका सीनदरम्यान सनी देओल आणि अनिल कपूरमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली होती. हा वाद एवढा पेटला होता की, सनीपाजीनं चक्क अनिल कपूरचा गळा दाबला होता. त्याला श्वास घेणेही अवघड झाले होते. दिग्दर्शकांच्या बºयाचदा कट म्हणूनही सनीने अनिल कपूरला सोडले नव्हते. दोघांमधील हा सीन एवढा रिअल झाला होता की, संपूर्ण युनिटला धाव घ्यावी लागली. युनिटमधील सर्वांनी सनी देओलला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सनीपाजी एवढ्या सहजा-सहजी कोणाला ऐकणे शक्य नव्हते. बराच वेळ हा प्रकार घडल्यानंतर सनीपाजीला बाजूला करण्यात आले. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :