सेक्सबद्दल कुणीही उघडपणे आणि बिनधास्तपणे बोलायला धजावत नाही. अशा गोष्टी दबक्या आवाजात किंवा सिक्रेटली शेअर केल्या जातात. त्यातच लग्नाआधी सेक्स लाइफबद्दलच्या गोष्टी कुणी सांगत नाही. मात्र नुकतंच अभिनेत्री आलिया भट्ट हिने एका मुलाखतीमध्ये आपल्या सेक्स लाइफबद्दल बिनधास्तपणे मत व्यक्त केले होते. आपली फेव्हरेट सेक्स पोझिशन द क्लासिक मिशनरी असल्याचं आलियाने कशाचीही पर्वा न करता सांगितले होते. आलियाप्रमाणेच बॉलिवूडच्या काही दिग्गजांनी सेक्स, बेडरुम सिक्रेट्सपासून ते लग्नाआधी सेक्स या विषयावर आपली रोखठोक मतं मांडली आहेत. जाणून घेऊया काय आहेत या सेलिब्रिटी मंडळींची लग्नाआधी सेक्स या विषयावरील मतं
काल्की कोच्लिन
‘’वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मी एका व्यक्तीला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. त्या वयात तर मला त्याचा अर्थसुद्धा माहिती नव्हता.”
सनी लिओनी
“लोक काय म्हणतील याचा विचार मी करत बसले असते तर ज्या ठिकाणी आज मी आहे कदाचित त्या ठिकाणी मी नसते. मन जे काही बोलतं तेच सगळ्यांनी केलं पाहिजे.”
दीपिका पादुकोण
सेक्स या विषयावर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या 'माय चॉइस' या व्हिडीओमध्ये मत मांडलं होतं. “लग्नाआधी सेक्स करणं किंवा न करणं ही ज्या त्या व्यक्तीची मर्जी आहे. कुणी जर तसं करत असेल तर त्यातही काही वावगं आहे असं मला बिल्कुल वाटत नाही.”
रणवीर सिंह
सेक्स या विषयावर रणवीर सिंह यानंही आपली मतं मांडलीयेत. “सेक्स ही एक सुंदर आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारे ते खराब किंवा चुकीचे नाही. त्यामुळे यांत लपवण्यासारखं काहीच नाही.”
राधिका आपटे
आपली बिनधास्त आणि बेधडक मतं मांडण्यात मागंपुढे न बघणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटे हिच्याकडे पाहिले जाते. ती म्हणते, “सेक्स ही विकाऊ गोष्ट आहे कारण आजही त्याकडे वर्ज्य म्हणून पाहिले जाते.”
अभय देओल
“जेव्हा मला इच्छा होते तेव्हा मी सेक्स करतो. त्याचा आनंद घेतो. सेक्स केल्यानंतर लपवण्यासारखं किंवा लाज बाळगण्यासारखं काहीही नाही. सेक्सचा ख-या अर्थाने आनंद घेतला पाहिजे.”
अनुराग कश्यप
माय नेम अभिमन्यू या सिनेमात लहान मुलांचं शोषण करणा-या व्यक्तीची भूमिका अनुराग कश्यपनं साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अनुरागनं एक धक्कादायक खुलासा केला होता. “बालपणी आपलं लैंगिक शोषण झालं होतं. ब-याच वर्षानंतर शोषण करणारी व्यक्ती माझ्यासमोर आली खरी, मात्र माझ्या नजरेशी नजर काही मिळवू शकली नाही. त्याला कदाचित त्या गोष्टीचा पश्चाताप होत असावा म्हणून मीसुद्धा त्याला माफ केलं होतं.”
सपना भवनानी
सपना ही 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक. निर्भया डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर सपनानं एक धक्कादायक बाब जगासमोर सांगितली होती. “वयाच्या 24 व्या वर्षी माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता.याचा खुलासा करण्यासाठी मला 20 वर्षे लागली.”
अनोष्का शंकर
प्रसिद्ध सतारवादक रवी शंकर यांची कन्या अनोष्का शंकर हिने युट्यूबवर आपल्या मनातली एक गोष्ट सांगितली होती.“बालपणी एका व्यक्तीने शोषण केलं होतं. ही तीच व्यक्ती होती, ज्यावर आईवडिल डोळे बंद करुनसुद्धा विश्वास करत होते.”
फ्रिडा पिंटो
''शारीरिक शोषण होतं हे मान्य करण्यात लाज बाळगण्याचं काहीही कारण नाही. मात्र ते लपवून ठेवण्यासारखी किंवा गुपचूप राहण्यासारखी यांत कोणतीही लाजीरवाणी गोष्ट नाही.”