​रिमा लागू यांच्याविषयी तुम्ही न ऐकलेल्या या काही गोष्टी

​रिमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली होती. सध्या त्या नामकरण या मालिकेत काम करत होत्या. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी काही गोष्टी...

​रिमा लागू यांच्याविषयी तुम्ही न ऐकलेल्या या काही गोष्टी
Published: 18 May 2017 02:37 PM  Updated: 18 May 2017 02:41 PM

रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिग्दर्शन क्षेत्राकडे वळण्याचे रिमा यांनी ठरवले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांची ही इच्छा लोकमत कार्यालयात व्यक्त केली होती. 

reema lagoo


हॉलिवूडमध्ये कलाकाराच्या वयानुरूप कलाकारासाठी भूमिका लिहिल्या जातात. त्यामुळे उतारवयातील कलाकारांनादेखील त्यांच्या भूमिका साकारता येतात. पण आपल्याकडे ते घडत नाही याची खंत रिमा लागू यांना होती.

reema lagoo

रंगभूमीवर काम करायला रिमा लागू यांना खूप आवडायचे. त्यांनी मराठी, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषेच्या नाटकांमध्ये काम केले आहे. 

reema lagoo

चित्रपटातील आई म्हटली की, ती गरीब, कष्ट करणारी अशीच दाखवण्यात येत असे. पण रिमा यांनी हा ट्रेंड बदलला. रिमा यांच्या रूपाने अतिशय फॅशनेबल, आईच्या रूपातील मैत्रीण अशी आई प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

reema lagoo
रिमा लागू त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बसने प्रवास करत असत. त्यांनी याविषयी अनेकवेळा सांगितले देखील आहे. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला बसने जात असत. तसेच त्या घरून नेहमी डबा घेऊन जात असत.

reema lagoo
रिमा लागू यांनी लोकमतच्या ऑफिसला भेट दिली असता त्यांनी त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी सांगितले होते की, आम्ही डबिंग करताना लाइटच्या खाली उभे राहायचो. तसेच सगळी वाक्ये आम्हाला लक्षात ठेवायला लागायची. तसेच त्या वेळात एडिटींग देखील खूप वेगळ्या प्रकारे व्हायचे. 

reema lagoo

नूतन ही रिमा लागू यांची आवडती अभिनेत्री होती. त्याचप्रकारे सुचित्रा सेन, वैजयंती माला यांच्या अभिनयाच्या त्या चाहत्या होत्या. 

reema lagoo

रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी ही त्यांची सगळ्यात मोठी समीक्षक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या आणि मृण्मयी अनेकवेळा चित्रपटांवर गप्पा मारत असत. 

reema lagoo




 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :