बॉलिवूडची ही अभिनेत्री करते सेंद्रीय शेती,पहिल्या सिनेमातील हिरोपासून मिळाली प्रेरणा

मोबाईल टॉवर्समधून निघणा-या धोकादायक लहरींविरोधातही ती जनजागृती करत आहे.याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून सेंद्रीय शेती करत आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री करते सेंद्रीय शेती,पहिल्या सिनेमातील हिरोपासून मिळाली प्रेरणा
Published: 19 Apr 2018 01:06 PM  Updated: 19 Apr 2018 01:06 PM

अभिनयासह सेलिब्रिटी मंडळी सध्या स्वतःला समाज कार्यात झोकून देत आहेत.अभिनयाला रसिक जितकी पसंती देतात किंबहुना त्याहून अधिक लोकप्रियता आणि प्रेम या कलाकार मंडळींना या समाज कार्यातून मिळते.अक्षयकुमार, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, आमिर खान यासारखे बरेच कलाकार सामाजिक कार्यात झोकून कार्यरत आहेत. बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री अभिनयासह एक हटके काम करत आहे.या अभिनेत्रीचे नाव आहे जुही चावला.गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही मोबाईल टॉवर्समधून निघणा-या धोकादायक लहरींविरोधात जनजागृती करत आहे.याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यात तिने योगदान दिले आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून जुही चावला सेंद्रीय शेती करत आहे.याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत आहे.नुकतेच वुमेन ऑफ इंडिया ऑर्गेनिक फेस्टिवल कार्यक्रमात जुही चावलाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली.पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते.जुहीचे वडील शेतकरी होते.त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली.मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.मात्र वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं.त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.(Also Read:संपदा कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी यांनी असे निर्माण केले 'आनंदाचे शेत')वाढत्या वयानुसार आपल्या चेह-यात आणि शरीरात बरेचसे बदल होत असतात.मात्र कधी-कधी स्वत:च्या चुकीमुळेही आपल्या चेह-यावर चुकीचे रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिच्याबरोबर घडले.नुकतेच जुहीने आॅस्ट्रिया येथून तिचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला.या फोटोमध्ये जुही मेकअपविना दिसत आहे. त्यामुळे तिला ओळखणे अवघड होत आहे.यावेळी तिने ट्विटरवर हेअर फॉल आणि स्किनच्या समस्येविषयीदेखील लिहिले. 'I suffered the most frightening chemical reaction on my scalp/face and learnt a harsh lesson .. So TODAY trashing the chemicals and embracing the BEST beauty kit ever !!!!'.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :