पेज 3 चित्रपटातील कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याने खऱ्या अर्थाने बॉलिवूड जगातील नातेसंबंधावर प्रकाश टाकला आहे. बॉलिवूडची ही दुनिया खूपच झगमगती आहे. मात्र या झगमगत्या दुनिये मागे अनेक कटू सत्यदेखील आहेत. करिअच्या सुरुवातीला खंबीरपणे पाठिमागे उभे राहिलेल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला यश मिळावल्यावर हे कलाकार विसरुन जातात. असे कोणकोण कलाकार आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर जाताच आपल्या पहिलाप्रेमाला आपल्यापासून दूर सारले.
रणबीर कपूर -अवंतिका मलिक
इम्रान खान बरोबर लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी अवंतिका आणि रणबीर 5 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. जसे रणबीर चित्रपटात व्यस्त झाला तसे हळूहळू त्यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर तिने इम्रान खानशी लग्न केले त्याच वेळेस रणबीरला दीपिका पादुकोणची साथ मिळाली.
सोनाक्षी सिन्हा - आदित्य श्रॉफ
जेव्हा सोनाक्षी फिल्म जगतात फारशी काही प्रसिद्ध नव्हती तेव्हा ती फेम एडलॅब्स च्या डायरेक्टरच्या मुलाच्या म्हणजेच आदित्य श्रॉफच्या प्रेमात होती, पण चित्रपटात यशस्वी होण्यासाठी सोनाने तिचे ५ वर्षाचे नात्याला पूर्णविराम दिला.
आलिया भट्ट - अली दादरकर
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधी आलिया तिचा बालपणीचा मित्र अली दादरकरला अनेक वर्ष डेट करत होती. अनेक वेळा सर्वाजनिक ठिकाणी त्यादोघांना एकत्र पाहण्यात आले होते. मात्र आलियाने ज्या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवताच त्यांच्या नात्याचा शेवट झाला. सध्या आलिया सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे मात्र यादोघांनी कधीही ही गोष्ट स्वीकारली नाही आहे.
ऐश्वर्या राय - राजीव मूलचंदानी
ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानी बरोबर रिलेशनशीपमध्ये होती. विश्वासुंदरी बनल्यानंतर ऐश्वर्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणे साहजिकच होते. जशी जशी या क्षेत्रात ती यशस्वी होत गेली तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली. राजीवनंतप ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सलमान बरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.
प्रियांका चोप्रा - असीम मर्चंट
प्रियांका चोप्राने आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहे. यासगळ्या प्रवासात तिला साथ मिळाली होती ती बॉयफ्रेंड असीम मर्चंटची. या दोघांचे नाते खुलत असताना प्रियांकाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला आणि त्यानंतर तिने अगदी अलगद पण असीमला आपल्या आयुष्यापासून दूर केले. असीमने तिच्या जीवनावर चित्रपट तयार करणार होता मात्र प्रियांकाने यावर नापसंती दर्शवली.
अभिषेक बच्चन -दीपानिता शर्मा
करीश्मा कपूर सोबतचा साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेक बच्चनच्या आयुष्यात दीपानिता शर्मा या मॉडलची एंट्री झाली होती. अभिषेक आणि दीपानिता काही काळ रिलेशनशीपमध्ये होते. याच दरम्यान अभिषेकला गुरु चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या राय भेटली आणि त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. यानंतर अभिषेक दीपानितासोबत नाते तोडून ऐश्वर्यासोबत विवाह बंधनात अडकला.