BirthDay Special : श्रीदेवीचे न ऐकलेले अफेअर्स...!

वयाची पाच दशके पूर्ण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. पन्नासी ओलांडलेल्या श्रीदेवीचा आज (१३ आॅगस्ट) वाढदिवस. श्रीदेवीच्या न ऐकलेल्या अफेअर्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

BirthDay Special : श्रीदेवीचे न ऐकलेले अफेअर्स...!
Published: 13 Aug 2017 01:34 PM  Updated: 13 Aug 2017 01:34 PM

वयाची पाच दशके पूर्ण करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. पन्नासी ओलांडलेल्या श्रीदेवीचा आज (१३ आॅगस्ट) वाढदिवस. १३ आॅगस्ट १९६३ साली जन्मलेल्या श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. अनेक पौराणिक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. जान्हवी आणि खुशी ही तिच्या दोन्ही मुलींची नावे आहेत. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती. पण अलीकडे ती पुन्हा जोमाने परतली.  आपल्या दिलकश अदांनी श्रीदेवीने सगळ्यांना वेड लावले.  अभिनयासोबतच आपल्या अफेअर्समुळेही श्रीदेवी कायम चर्चेत राहिली. आज श्रीदेवीच्या न ऐकलेल्या अफेअर्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत...

जितेन्द्रसोबत प्रेम पडले महाग...१६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेन्द्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली. बॉलिवूडमध्ये येण्याआधी श्रीदेवी जितेन्द्रची मोठी चाहती होती. त्यामुळे जितेन्द्रसोबत काम करायचे म्हटल्यावर श्रीदेवीचा आनंद गगणात मावेनासा झाला. ‘हिम्मतवाला’ जबरदस्त हिट राहिला आणि यानंतर दोघांच्याही रोमान्सच्या चर्चाही रंगल्या. जितेन्द्रबद्दलच्या भावना श्रीदेवी उघड उघड बोलायला लागल्यावर जितेन्द्रची पत्नी शोभा कपूर हिचा संताप अनावर झाला. शोभा व जितेन्द्र यांच्या प्रचंड तणाव निर्माण झाला. हा तणाव दूर करण्यासाठी जितेन्द्रने श्रीदेवीना घरी बोलवून पत्नीशी भेट घालून दिली. यावेळी शोभा कपूरने श्रीदेवीला जो पाहुणचार दिला, तो श्रीदेवी कधीच विसरू शकत नाही. हीच भेट श्रीदेवी आणि जितेन्द्रच्या मतभेदाचे कारण ठरले.

अमृतराजचा प्रस्ताव नाकारलाकरिअर शिखरावर असताना जितेन्द्रनंतर श्रीदेवीचे नाव सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू विजय अमृतराज याच्यासोबत जुळले. अमृतराज हे टेनिससोबतच हॉलिवूडचेही मोठे नाव होते. अमृतराजच्या मनात श्रीदेवी बसली होती. त्यामुळे अमृतराजचे कुटुंब श्रीदेवीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. यानंतर या साखरपुड्याची तयारी सुरु झाली होती, असेही कळते. पण ही तयारी सुरु असताना श्रीदेवीने अचानक या नात्याला नकार दिला. अमृतराजनंतर ‘बॉम्बे फेम’ अरविंद स्वामी यांच्या कुटुंबीयांनीही श्रीदेवीला मागणी घातली होती. पण त्यावेळी श्रीदेवीचे वय खूप कमी होते. यानंतर श्रीदेवीने या नात्यालाही नकार दिला.

श्रीदेवी-मिथुनचे लव्ह अफेअर्सही गाजलेवेळोवेळी श्रीदेवीचे नाव अनेकांशी जुळले. पण यात सर्वाधिक गाजले ते श्रीदेवी व मिथुनचे अफेअर. १९८४ मध्ये ‘जाग उठा इन्सान’च्या शूटींगदरम्यान श्रीदेवी व मिथुन यांचे प्रेम बहरले. मिथुन दा यांना श्रीदेवीशी लग्न करायचे होते. मात्र त्यासाठी मिथुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा, अशी श्रीदेवीची अट होती. (श्रीदेवी व मिथुन यांनी सीक्रेट मॅरेज केले होते, असेही म्हटले जाते.) मिथुनने पत्नी योगिता बालीवर घटस्फोटासाठी दबाव टाकल्यावर योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या या टोकाच्या निर्णयामुळे मिथुन यांनी श्रीदेवीसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

मिळाली बोनी कपूरची सोबत


मिथुन यांच्यासोबतचे नाते संपल्यानंतर दोघांचाही कॉमन फ्रेन्ड राहिलेला बोनी कपूर श्रीदेवीच्या आयुष्यात आला. सर्वप्रथम त्याने श्रीदेवीला ‘मि. इंडिया’ची आॅफर दिली. श्रीदेवीला हा चित्रपट करायचा नव्हता. म्हणून तिने या चित्रपटासाठी बोनीला १० लाख रुपए मानधन मागितले. त्याकाळात ही रक्कम फार मोठी होती. पण बोनीने श्रीदेवीची ही मागणी मान्य केली. हा चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. याचदरम्यान श्रीदेवीची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनीने उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आली. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या लग्नाआधी श्रीदेवी प्रेग्नंट होती. त्यामुळे हे लग्न दोघांचीही मजबुरी होती. बोनी विवाहित होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन बोनीने श्रीदेवीशी लग्न केले. या दोघांच्या आज दोन मुली आहेत.


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :