Sonakshi Sinha-Siddharth Malhotra work together : सोनाक्षीची भूमिका नकारात्मक

नेहमीच चॅलेंजिग रोलच्या शोधात असलेली सोनाक्षी लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट ‘ग्रे शेड’ भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sonakshi Sinha-Siddharth Malhotra work together  : सोनाक्षीची भूमिका नकारात्मक
Published: 22 Jan 2017 07:44 PM  Updated: 22 Jan 2017 07:44 PM

रोमाँटिक, कॉमेडी व अ‍ॅक्शन चित्रपटात दमदार भूमिका केल्यावर बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी आगामी ‘नूर’ या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल. नेहमीच चॅलेंजिग रोलच्या शोधात असलेली सोनाक्षी लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट ‘ग्रे शेड’ भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

७० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या बी.आर.चोपडा निर्मित राजेश खन्ना व नंदा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येत असून यात सोनाक्षी सिन्हा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा प्रथमच ग्रे शेडची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राजेश खन्नाने साकारलेली भूमिका सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहे. मिळालेल्या बातम्यांच्या आधारे, या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पुढील महिन्यापासून सुरू होईल. या चित्रपटाचे नाव तेच असेल किंवा बदलण्यात येईल का? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.  Read More : ‘नूर’चे शूटिंग संपलेसिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा ही जोडी प्रथमच एखाद्या चित्रपटात दिसणार आहे. दोन्ही कलावंतासाठी मागील वर्ष फारचे चांगले ठरलेले नाही. गत वर्षी दोघांचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाई करू शकले नव्हते. सोनाक्षीचा जॉन अब्राहम सोबतच ‘फोर्स२’ व  ‘अकिरा’ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा कॅटरिना कैफ सोबतचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. सिद्धार्थच्या ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बºयापैकी कमाई केली होती. Read More : रॅम्पवर सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ सेक्सी अदा! सुनील सिप्पी दिग्दर्शित ‘नूर’ हा चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कराची, यू आर किलिंग मी’ या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल. दरम्यान  सोनाक्षी सिन्हा या वर्षांत एक मोठा धमाका करणार असल्याची चर्चा आहे. घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी बॉयफ्रेन्ड बंटी सजदेह याच्यासोबत साखरपुडा करणार असल्याची एकच चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. 

ALSO READ : 
घरच्यांचा विरोध डावलून सोनाक्षी सिन्हा करणार का साखरपुडा?
२०१७ सालातील महिला केंद्रित चित्रपट : पाच अभिनेत्रींच्या करिअरसाठी महत्त्वाचे


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :