WATCH video : ​हे काय? घाबरण्याऐवजी अबराम खिदळत सुटला! शाहरूख खान झाला चिंतीत!!

शाहरूख खानप्रमाणेच त्याचा लहान मुलगा अबराम खान याचीही जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. शाहरूखपेक्षा अबरामचे चाहते अधिक आहे, असेही म्हटले तरी वावगे होणार नाही. अबरामबद्दलची बारीक-सारिक गोष्ट शाहरूख सोशल मीडियावर शेअर करतो, त्याचे हेच कारण आहे.

WATCH video : ​हे काय? घाबरण्याऐवजी अबराम खिदळत सुटला! शाहरूख खान झाला चिंतीत!!
Published: 19 Nov 2017 12:01 PM  Updated: 19 Nov 2017 12:03 PM

शाहरूख खानप्रमाणेच त्याचा लहान मुलगा अबराम खान याचीही जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. शाहरूखपेक्षा अबरामचे चाहते अधिक आहे, असेही म्हटले तरी वावगे होणार नाही.  अबरामबद्दलची बारीक-सारिक गोष्ट शाहरूख सोशल मीडियावर शेअर करतो, त्याचे हेच कारण आहे. यावेळी शाहरूखने अबरामबद्दल अशाी माहिती शेअर केलीय, ज्यामुळे शाहरूख स्वत: चिंतीत आहे. होय, अबरामच्या एका प्रतिक्रियेने शाहरूखला असे काही अवाक् केले की, ही गोष्ट चाहत्यांशी शेअर करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही.
 

 

Should I be worried...my lil son laughs looking at this instead of being scared...Ughh!!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on
होय,शाहरूखने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शाहरूख एका जोंबीसारखा दिसतोयं. हा व्हिडिओ स्नॅपचॅटद्वारे बनवण्यात आल्याचे मानले जात आहे. हा व्हिडिओ आणि यातला जोंबी बनलेला शाहरूख खरंच मनाचा थरकाप उडवणारा आहे. पण आश्चर्य म्हणजे, चिमुकल्या अबरावर याचा काहीही परिणाम झाला नाही. हा व्हिडिओ पाहून घाबरण्याऐवजी अबराम जोरजोरात खिदळू लागला. मग काय, अशास्थितीत शाहरूख चिंतीत होणे स्वाभाविकचं म्हणायला हवे. त्याने लगेच ही गोष्ट चाहत्यांशी शेअर केली. ‘हा व्हिडिओ पाहून माझा लहान मुलगा घाबरण्याऐवजी हसतो आहे. मला याची चिंता वाटायला हवी का?,’ असे हा व्हिडिओ शेअर करत शाहरूखने लिहिले आहे. आता शाहरू्नखच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे हे तुम्हीच ठरवा. अर्थात त्या आधी शाहरूखने शेअर केलेला हा व्हिडिओं तुम्ही पाहायलाच हवा.

ALSO READ : SEE PICS : ​‘कुछ कुछ होता है’ पार्ट २ बघायचायं? मग शाहरूख खान व काजोलचे हे फोटो पाहाच!!

शाहरूख आपल्या तिन्ही मुलांबद्दल कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहे.  तेवढाच त्यांच्या क्लोजही आहे.  आर्यन आणि सुहाना या दोन्ही मुलांना तर शाहरूख प्रेमाने ब्रो असे बोलावतो. तो मुलांसोबत अगदी मित्रांप्रमाणे वागतो. सध्या शाहरूखचे सुहाना आणि आर्यन ही दोन मुले मोठी झाली असली तरी, त्यांची जागा आता अबरामने घेतली आहे. त्यामुळेच आर्यन आणि सुहानापेक्षा अबराम शाहरूखच्या सर्वाधिक क्लोज आहे. अबराम हा प्री मॅच्योर बेबी आहे. जेव्हा अबरामचा जन्म होणार होता, तेव्हा शाहरूखवर सेक्स डिटमिनेशन टेस्टचे आरोप लावण्यात आले होते. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :