​या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पडले होते एकमेकांच्या प्रेमात

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून ते लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील नव्वदीच्या दशकात ऐकायला मिळाल्या होत्या.

​या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पडले होते एकमेकांच्या प्रेमात
Published: 13 Jun 2018 02:32 PM  Updated: 13 Jun 2018 02:32 PM

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. संजय दत्तचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले. त्याने तीन वेळा लग्न केले तर अनेक वेळा तो प्रेमात पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात तर तो आपल्याला ३५० तरी गलफ्रेंड होत्या असे सांगताना आपल्याला दिसत आहे. संजयच्या अनेक नायिकांसोबतच्या प्रेमकथा चांगल्याच गाजल्या. 
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून ते लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील नव्वदीच्या दशकात ऐकायला मिळाल्या होत्या. १९९३ ला झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची प्रेमकथा कधी सुरू झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 
संजू या चित्रपटात माधुरी दीक्षितचा उल्लेख पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षितची भूमिका करिश्मा तन्ना साकारणार आहे. करिश्मा सध्या नागिन या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. संजू आणि माधुरी यांनी साजन या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेरच्या बातम्या यायला लागल्या. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे प्रेमात पडले असे म्हटले जाते.  
संजय आणि माधुरीच्या नात्याविषयी लेखक यासिर उसमान यांनी संजय दत्तः द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूडस बॅड बॉय या पुस्तकात लिहिले होते. त्यांनी नमूद केले होते की, संजय दत्तची पहिली पत्नी रिचा कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना तिला माधुरी आणि संजच्या अफेअरविषयी कळले. त्यावेळी तिची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झाली होती. मीडियातील बातम्या वाचून तिला काहीही करून भारतात परतायचे होते आणि आपला संसार वाचवायचा होता. 
रिचा काहीच महिन्यांनंतर त्यांची मुलगी त्रिशालासोबत भारतात परतली. तिचा आजार बरा झाला होता. पण संजय तिला टाळू लागला होता. सिनेब्लिझ्टला दिलेल्या मुलाखतीत तर रिचाच्या बहिणीने सांगितले होते की, रिचा आणि त्रिशालाला विमानतळावर घ्यायला देखील संजय त्यावेळी गेला नव्हता. रिचा परतली तोपर्यंत संजय पूर्णपणे बदलला होता. त्यामुळे १५ दिवसांतच ती पुन्हा न्यूयॉर्कला परतली आणि रिचाने संजयला घटस्फोट देण्याचे ठरवले. पण त्याच काळात तिचा कॅन्सर उलटला आणि तिची तब्येत ढासळत गेली. 

Also Read : साजन या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त नव्हे तर हे कलाकार दिसणार होते मुख्य भूमिकेत


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :