​ Shocking !! पुढचे ११ दिवस सलमान खान जाणार अज्ञातवासात!

सलमानला सध्या श्वास घ्यायलाही फुरसत नाहीयं. पण कदाचित इतका व्याप बरा नाही, हे सलमानला आताश: कळून चुकलेय.

​ Shocking !! पुढचे ११ दिवस सलमान खान जाणार अज्ञातवासात!
Published: 12 Sep 2017 03:25 PM  Updated: 12 Sep 2017 03:25 PM

सध्या ‘भाई’ प्रचंड बिझी आहे. ‘सुल्तान’नंतर लगेच‘ट्यूबलाईट’चे शूटींग सुरू झाले. हा चित्रपट हातावेगळा होत नाही तोच भाई ‘टायगर जिंदा है’मध्ये गुंतला. आता ‘टायगर जिंदा है’ संपल्या संपल्या भाईजान ‘बिग बॉस11’ आणि ‘रेस3’मध्ये बिझी होणार आहे. याशिवाय प्रॉडक्शन हाऊसचा व्याप, ‘द बँग टूर’ हेही आहेच. आता आम्ही सलमान खानबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळले असेलच. सांगायचा मुद्दा हा की, सलमानला सध्या श्वास घ्यायलाही फुरसत नाहीयं. पण कदाचित इतका व्याप बरा नाही, हे  सलमानला आताश: कळून चुकलेय. त्यामुळेच येत्या काही दिवस फक्त स्वत:ला वेळ देण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. होय, येत्या काही दिवस भाईजान ठरवून सुट्टी घेणार आहे. ‘टायगर जिंदा है’चे शूटींग संपवून भारतात परतताच सल्लू भाईजान केवळ आराम आणि आराम करणार आहे. विशेष म्हणजे, आराम करण्यासाठी सलमानने जागाही निवडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायला आवडणार असेल तर आम्ही त्याचीही माहिती देतो.

होय, पनवेल येथील फार्महाऊस. सलमान याच फार्महाऊसमध्ये सुटी घालवणार आहे. याठिकाणी तब्बल ११ दिवस सलमान विश्रांती घेणार आहे. यादरम्यान कुणीही त्याला डिस्टर्ब करण्याची परवानगी नसेल. याठिकाणी सलमान एकटा असेल आणि पूर्णपणे स्वत:ला वेळ देईल. या फार्महाऊसबद्दल बोलायचे तर येथे सर्व सुखसुविधा आहेत. स्विमींग पूल सोबतच हॉर्स रायडिंग शिवाय स्वत:ला फिट ठेवण्यासाठी एक अलिशान जिम असे सगळे इथे आहे. त्यामुळे सलमानला मुळीच चिंता नाही. तूर्तास या फार्महाऊसची स्वच्छता जोरात सुरु आहे. सलमानच्या स्वागतासाठी फार्म हाऊस सज्ज केले जातेय.

ALSO READ : ​कॅटरिना कैफवर अशी काही खिळली सलमान खानची नजर!

‘टायगर जिंदा है’च्या शूटींगवरून परतल्यानंतर सलमान थेट या फार्महाऊसमध्ये येईल. याठिकाणी आराम केल्यानंतर लगेच तो ‘बिग बॉस11’ आणि ‘रेस3’चे शूटींग सुरू करेल. म्हणजे पुन्हा सलमानला श्वास घ्यायलाही फुरसत नसेल. त्यामुळे सलमानचे हितचिंतक या नात्याने या ब्रेकटाईममध्ये धम्माल मज्जा करावी, रिलॅक्स व्हावे आणि पुन्हा नव्या जोमाने कामावर परतावे, असे आम्हाला वाटतेय. तुम्हालाही हेच वाटत असावे, होय ना?


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :