CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?

बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, ही अभिनेत्री आहे, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल रिया सेन. सुचित्रा सेन यांची नात आणि मुनमुन सेन यांची मुलगी रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे.

CONGRATULATIONS!! ​रिया सेन करतेय लग्न ! पण कुणासोबत?
Published: 16 Aug 2017 04:02 PM  Updated: 16 Aug 2017 04:04 PM

बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगणार आहे. होय, ही अभिनेत्री आहे, बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल रिया सेन. सुचित्रा सेन यांची नात आणि मुनमुन सेन यांची मुलगी रिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. या महिन्यात रिया तिचा बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. रिया सध्या ३६ वर्षांची आहे. शिवम हा तिचा जुना मित्र. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. रिया कायम त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोतील दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखीच आहे.

अलीकडे रियाची आई मुनमुन सेन हिने एका मुलाखतीत, लेकीच्या पतीबद्दलच्या कल्पना सांगितल्या होत्या. रियासाठी सुंदर दिसणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा तिच्यासाठी महत्त्वाचा नाही. हाय मेंटेनन्सला घेऊन ती गंमत करते. ती आपल्यासाठी एक श्रीमंत पती शोधून घेईल, असे मुनमुन म्हणाली होती.
 
 

A post shared by Riya Sen Dev Varma (@riyasendv) on१९९१ मध्ये ‘विषकन्या’ या चित्रपटात रिया सेन बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट एक सेक्स कॉमिडी चित्रपट होता. अर्थात रियाचे बॉलिवूड करिअर फार यशस्वी नव्हतेच. काही बंगाली व मल्याळम सिनेमही तिने केले. फाल्गुनी पाठकच्या आवाजातील ‘याद पिया की आने लगी’ या गाण्याने रियाला खरी ओळख दिली. त्यावेळी रिया केवळ १६ वर्षांची होती. २००५ मध्ये रियाचा एक एमएमएस आला होता. यात ती अभिनेता अश्मित पटेलसोबत दिसली होती. सध्या रिया ही एकता कपूरच्या ‘एमएमएस202’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. यात रिया प्रचंड बोल्ड आणि सेक्सी अंदाजात दिसणार आहे. या बेवसीरिजद्वारे रियाला पुन्हा तिची ओळख परत मिळो, इतकी कामना करूया.

RELATED ARTICLES


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :