Wedding Album : पाहा, ‘हॉट’ रिया सेनच्या हळदीपासून तर सप्तपदीपर्यंतचे फोटो!

मुनमुन सेनची लहान मुलगी रिया सेन अलीकडे विवाहबंधनात अडकली. रियाच्या या लग्नसोहळ्याचा लग्नमंडपातील एक फोटो तुम्ही पाहिला होता. पण आता आम्ही रियाच्या लग्नाचा अख्खा अल्बम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Wedding Album : पाहा, ‘हॉट’ रिया सेनच्या हळदीपासून तर सप्तपदीपर्यंतचे फोटो!
Published: 21 Aug 2017 01:50 PM  Updated: 21 Aug 2017 01:50 PM

मुनमुन सेनची लहान मुलगी रिया सेन अलीकडे विवाहबंधनात अडकली. शिवम तिवारीसोबत तिने लग्नगाठ बांधली. बंगाली रितीरिवाजानुसार रिया व शिवम यांचे लग्न झाले. पुण्यात अगदी गुपचूपपणे हा विवाह सोहळा झाला. रिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, त्यामुळे तिने कुठलाही गाजावाजा न करता मोजक्याच मित्रपरिवारांसमवेत बॉयफ्रेंड शिवम तिवारीबरोबर लग्न उरकले,अशी चर्चा या विवाहसोहळ्यानंतर दबक्या आवाजात सुरु झाली. अर्थात या बातमीला कुठलाही आधार नसल्याने ही निव्वळ चर्चा ठरली. 

रियाच्या या लग्नसोहळ्याचा लग्नमंडपातील एक फोटो तुम्ही पाहिला होता. पण आता आम्ही रियाच्या लग्नाचा अख्खा अल्बम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, रियाच्या हळदीपासून तर सप्तपदीपर्यंतचे अनेक फोटो तुम्हाला यात पाहायला मिळतील.







रियाची मोठी बहीण रायमा सेन हिने रियाच्या लग्नाचे फोटो  शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिया व शिवम यांच्याशिवाय मुनमुन सेन, रायमा असे सगळेच आहेत. तेव्हा बघा तर आणि हे फोटो तुम्हाला कसे वाटले, हे कळवायला विसरू नका.







रियाचा लाडका हबी शिवम फोटोग्राफीच्या क्षेत्रात सक्रिय असून, विविध ठिकाणी भटकंती करण्याचीही त्याला आवड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिया शिवमला डेट करतेय. रियाच्या स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.  







 १९९१ मध्ये ‘विषकन्या’ या चित्रपटात रिया सेन बालकलाकार म्हणून दिसली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट एक सेक्स कॉमिडी चित्रपट होता. अर्थात रियाचे बॉलिवूड करिअर फार यशस्वी नव्हतेच. काही बंगाली व मल्याळम सिनेमही तिने केले.



ALSO READ :  रिया सेनचा हॉट बिकनी अवतार तुम्ही पाहिलायं?

फाल्गुनी पाठकच्या आवाजातील ‘याद पिया की आने लगी’ या गाण्याने रियाला खरी ओळख दिली. त्यावेळी रिया केवळ १६ वर्षांची होती. २००५ मध्ये रियाचा एक एमएमएस आला होता. या एमएमएसने चांगलीच खळबळ माजली होती. यात ती अभिनेता अश्मित पटेलसोबत दिसली होती. सध्या रिया ही एकता कपूरच्या ‘एमएमएस202’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. यात रिया प्रचंड बोल्ड आणि सेक्सी अंदाजात दिसणार आहे.  


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :