...हे आहेत तोंडावर ताबा न ठेवणारे सेलेब्स!!

आपल्या वाणीने नेहमीच वादाला निमंत्रण देणारी आयटम गर्ल राखी सावंत सध्या लुधियाना पोलिसांच्या रडारवर आहे. गेल्यावर्षी राखीने महर्षी वाल्मीकी आणि त्यांच्या अनुयायांप्रती अनुद्गार काढले होते.

...हे आहेत तोंडावर ताबा न ठेवणारे सेलेब्स!!
Published: 05 Apr 2017 03:13 PM  Updated: 05 Apr 2017 03:13 PM

आपल्या वाणीने नेहमीच वादाला निमंत्रण देणारी आयटम गर्ल राखी सावंत सध्या लुधियाना पोलिसांच्या रडारवर आहे. गेल्यावर्षी राखीने महर्षी वाल्मीकी आणि त्यांच्या अनुयायांप्रती अनुद्गार काढले होते. मात्र राखीबाबत असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला असे अजिबात नाही; तर यापूर्वीदेखील तिने वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या वाचाळवाणीचे दर्शन घडवून दिले आहे. वास्तविक सेलिब्रिटी जगतात राखी आपल्या वाणीवर ताबा न ठेवणारी एकमेव सेलेब्स नसून, इतरही काही सेलेब्स असे आहेत, जे अजूनही आपल्या वाणीवर ताबा ठेवू शकले नाहीत. कारण मध्येच काही तरी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेण्यात जणूकाही यांचा हातखंडाच आहे. कपिल शर्मा

तोंडावर ताबा न ठेवल्यास एका उंचीवरून तुम्हाला जमिनीवर कसे सपाटून आदळून टाकले जाऊ शकते याचे ताजे उदाहरण म्हणजे कॉमेडियन कपिल शर्मा हे होय. कपिलने दारूच्या नशेत आपल्या सहकाºयांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्याशी हातापाई केल्याने आता त्याच्या शोवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कालपरवापर्यंत या शोचा झपाट्याने टीआरपी घटल्याचे समोर आले होते. आता तर हा शोच बंद पडणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने केवळ तोंडावर ताबा ठेवू न शकल्यानेच कपिलची ही दशा झाली आहे. आता कपिल त्याचे स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. केआरके 
स्वत:ला नंबर एकचा क्रिटिक आणि इतरांना टूरूपीज पीपल म्हणणारा केआरके अर्थात कमाल आर खान याला तर कित्येकांनी वाचाळवीराची उपाधी दिली आहे. कारण कोणावरही अपमानास्पद वक्तव्य करण्याचा केआरकेने जणू काही विडाच उचलला आहे. सोशल मीडियावर नेहमीच वाट्टेल ती टीका करणाºया केआरकेवर बºयाचदा त्याची वाचाळवाणी उलटीही पडली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तर त्याच्या कानाखाली वाजवायची इच्छा होत असल्याचे म्हटले आहे. परंतु सुधारणार तो केआरके कसला!रामगोपाल वर्मा
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचाही या मंडळींमध्ये सहभाग आहे. कारण बºयाचदा रामगोपाल वर्मा असे काही वक्तव्य करतात की, ज्यामुळे हमखास वाद निर्माण होतो. आतापर्यंत त्यांनी बॉलिवूड स्टार्सपासून ते देवांचीही खिल्ली उडविली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टायगर श्रॉफला गे म्हटले होते. तसेच जागतिक महिलादिनी सनी लिओनीचा दाखला देत महिलांविषयी आक्षेपार्ह ट्विट करून स्वत:हून वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या स्वभावामुळे बºयाचदा नेटिझन्सकडून त्यांचा पाणउतारा करण्यात आला आहे. अशातही रामगोपाल वर्मांच्या वागणुकीत सुधारणा झालेली दिसत नाही. अभिजीत भट्टाचार्य

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा आवाज समजला जाणारा गायक अभिजीत भट्टाचार्य हा एकेकाळी बॉलिवूडमध्ये टॉपच्या गायकांमध्ये गणला जायचा. मात्र अलीकडच्या काळात तो त्याच्या गाण्यांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत राहतो. गेल्या वर्षी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात सलमान खानच्या बाजूने बोलताना फुटपाथवर राहणाºया लोकांची कुत्र्यांसोबत तुलना केल्यामुळे तो अडचणीत सापडला होता. त्याचबरोबर एका लाइव्ह डिबेट शोदरम्यान त्याने एका पत्रकाराला शिवीगाळ केली होती. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :