​प्रियांका चोप्रा झाली भावूक; सोडावे लागणार हॉलिवूड!!

प्रियांका चोप्राला भारतातील असंख्य चाहते मिस करताहेत. पण येत्या दिवसांत प्रियांका हॉलिवूड मिस करणार आहे.

​प्रियांका चोप्रा झाली भावूक; सोडावे लागणार हॉलिवूड!!
Published: 17 Apr 2017 01:44 PM  Updated: 17 Apr 2017 01:44 PM

प्रियांका चोप्राला भारतातील असंख्य चाहते मिस करताहेत. पण येत्या दिवसांत प्रियांका हॉलिवूड मिस करणार आहे. होय, आपल्या हॉलिवूड करिअरसाठी प्रियांकाने गेल्या वर्षभरापासून न्यूयॉर्कला आपले दुसरे घर बनवले होते. पण आता हे दुसरे घर सोडण्याची वेळ आलीय.  प्रियांकासाठी हा भावूक करणारा क्षण आहे. न्यूयॉर्कमध्ये सामानाची बांधाबांध करताना प्रियांकाला भरून आले. सोशल मीडियावर तिने तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘घरातील सामान पॅक करणे किती भावूक करणारे आहे. अनेक अशा गोष्टी मिळतात, ज्यांचा तुम्हाला विसर पडलेला असतो. न्यूयॉर्कमध्ये शेवटचा आॅफिशिअल वीक...’, असे प्रियांकाने twitter वर लिहिले आहे.




अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’चे दुसरे सीझन आणि ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटासाठी प्रियांका न्यूयॉर्कमध्ये राहतेय. तिचे हे दोन्ही प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत. या प्रोजेक्टनंतर प्रियांकाने हॉलिवूडचे काही चॅट शो केले. हॉलिवूड सेलिब्रिटींसोबत अनेक इव्हेंटमध्ये क्वालिटी टाईम घालवताना ती दिसली. पण आता ती भारतात परतण्याची वेळ आली आहे. हॉलिवूडचा नवा प्रोजेक्ट मिळत नाही, तोपर्यंत प्रियांकाला भारतात परतावे लागणार आहे. प्रियांकाने एबीसी स्टुडिओ आणि क्वांंटिकोच्या प्रोड्यूसर्ससोबत करार केल्याची बातमी मध्यंतरी आली होती. क्वांटिकोचे तिसरे सीझन येणार, असे त्यावेळी बोलले गेले होते. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ALSO READ : - तर प्रियांका चोप्राची ‘या’ चित्रपटाद्वारे होणार बॉलिवूड वापसी?

प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट लवकरच रिलीज होणार आहे. तूर्तास याचे प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनसाठी प्रियांकाला पुन्हा न्यूयॉर्कला जावे लागेल. पण तोपर्यंत तरी प्रियांका भारतातील तिच्या घरी परतणार आहे. प्रियांका यामुळे थोडी भावूक झाली असली तरी आपल्यासाठी निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे. होय ना?


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :