म्हणून या सेलिब्रिटींनी केले दुस-यांदा लग्न

सेलिब्रिटींमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांचं पहिलं लग्न अपयशी ठरलं तरी ते त्यांच्या दुस-या लग्नानंतरचं जीवन आनंदानं जगत आहेत.

म्हणून या सेलिब्रिटींनी केले दुस-यांदा लग्न
Published: 12 Jul 2017 10:25 AM  Updated: 12 Jul 2017 11:37 AM

असं म्हणतात की रब ने बना दी जोडी. प्रत्येकासाठी देवानं त्याची जोडी कुणासोबत तरी बनवली असून ज्याला त्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार हा सापडतो. आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत मग ते रेशीमगाठीत अडकतात.मात्र हे नातं आयुष्यभर टिकावं यासाठी तुमचं आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम असावं लागतं. तरच ते नातं फुलतं आणि बहरतं. सामान्यांच्या बाबतीत रियलमध्ये हे घडतं.मात्र सेलिब्रिटी मंडळींच्या बाबतीत बाब काहीशी वेगळी असते. कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे या प्रसिद्ध गाण्यांच्या ओळींप्रमाणे या झगमगत्या दुनियेत नाती फार काळ टिकत नाही. काही सेलिब्रिटींच्या वैवाहिक जीवनाविषयीसुद्धा असंच काहीसं म्हणता येईल. या ना त्या कारणामुळे ब्रेकअप आणि नाती तुटणं सेलिब्रिटींसाठी नवं नाही. करियरमध्ये जस जसं ते पुढे जातात तसतसं त्यांना समजून घेणारा दुसरा जोडीदार सापडतो आणि त्यांच्या पुढच्या जीवनप्रवासाला सुरुवात होते.पहिलं लग्न अपयशी ठरलं तरी दुसरं लग्न करुन सेलिब्रिटी नवा संसार थाटतात. सेलिब्रिटींमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांचं पहिलं लग्न अपयशी ठरलं तरी ते त्यांच्या दुस-या लग्नानंतरचं जीवन आनंदानं जगत आहेत.पाहूया कोण आहेत ती सेलिब्रिटी मंडळी.
 

सैफ अली खान आणि करीना कपूर
 

बॉलिवूडचा छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग 1991 साली रेशीमगाठीत अडकले. सैफ आणि अमृता यांच्या वयात जवळपास 13 वर्षांचं अंतर असतानाही झालेल्या या लग्नानं सा-यांनाच अचंबित केलं होतं. सैफ-अमृताला सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुलं आहेत. मात्र 13 वर्ष एकत्र नांदल्यानंतर सैफ आणि अमृतानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान सैफ अली खानची बॉलीवुडची बेबो करीना कपूरशी जवळीक वाढली. दोघांमधील प्रोफेशनल संबंध हळूहळू मैत्री आणि त्यानंतर ते प्रॆमात बदलले. त्यामुळेच सैफ आणि करीनानं आपल्या प्रेमाला नव्या नात्याचं नाव दिलं. दोघंही रेशीमगाठीत अडकले. सध्या नवाब सैफ आणि बेगम करीना यांचा सुखी संसार सुरु असून त्यांच्या आयुष्यात तैमूर नावाचा नवा पाहुणाही दाखल झाला आहे. अमृताशी पहिलं लग्न अपयशी ठरलं तरी सैफ त्याच्या दुस-या लग्नात खुश असल्याचं दिसतंय.
 
आमिर खान आणि किरण रावमिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान यानं त्याची पहिली पत्नी रिना दत्ता हिला घटस्फोट दिला त्यावेळी ही बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला. यानंतर आमिरनं किरण रावशी दुसरं लग्न केलं.आमिर आणि किरणची लगान सिनेमाच्या सेटवर ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. काही महिन्यांनंतर दोघंही रेशीमगाठीत अडकले.सध्या दोघांचाही सुखी संसार सुरु आहे.
 
संजय दत्त आणि मान्यता दत्त
 


बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तच्या जीवनात अनेक चढउतार आलेत.त्यांच्या जीवनात अनेक वादळं आली. संजय दत्तचं पहिलं लग्न यशस्वी ठरलं नाही. त्यानं रिहा पिल्लईला काडीमोड देऊन मान्यता दत्त हिच्याशी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तच्या जीवनातील कठीण प्रसंगी मान्यता त्याच्यासोबत ठामपणे उभी होती. त्यामुळेच संजय दत्तनं त्याचं पुढचं आयुष्य मान्यतासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघंही सुखानं नांदत आहेत.
 
शेफाली शाह आणि विपुल शाह
 


रंगीला सिनेमातून अभिनेत्री शेफाली शाह हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच दरम्यान 1997 साली शेफालीनं अभिनेता हर्ष छायासह लग्न करुन संसार थाटला. मात्र दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. चार वर्षांनंतरच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शेफालीनं 2001 साली प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक विपुल शाह यांच्याशी लग्न केलं. विपुल शाह आणि शेफाली शाह बॉलीवुडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. त्यांना दोन मुलं असून शेफाली अजूनही सिनेमात काम करत आहे.
 
रोनित रॉय आणि निलम बोस
 


अभिनेता रोनित रॉय याचं ओना हिच्याशी पहिलं लग्न झालं होतं.मात्र दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. त्यांची मुलगी अवघी सहा महिन्यांची असताना रोनितनं ओनाशी घटस्फोट घेतला. यानंतर रोनितनं त्याची मैत्रिण निलम बोस हिच्याशी लग्न केलं. दोघंही आता सुखानं संसार करत असून आपल्या वैवाहिक जीवनात खुश आहेत. निलम जीवनातील प्रत्येक संकटक्षणी ठामपणे पाठिशी उभी राहिल्याचं रोनितनं सांगितलं.
 
हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान
 


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी म्हणजे हितेन आणि गौरी प्रधान. रिल लाइफप्रमाणे दोघंही रियल आयुष्यात दोघांचं घट्ट नातं आहे.मात्र फार कमी जणांना माहित आहे की हितेनचं गौरीसोबत दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. करियरची सुरुवात केली त्याच वेळी अवघ्या महिन्यात हितेन रेशीमगाठीत अडकला होता. मात्र करियरमुळे पहिल्या पत्नीला वेळ देऊ शकत नसल्यानं दोघांमध्ये प्रेमाचं नातं बहरलं नाही. त्यामुळेच त्यानं पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. याच काळात हितेनच्या आयुष्यात गौरीची एंट्री झाली. दोघांचं एकमेंकांवर जीवापाड प्रेम असून आता सुखी संसार करत आहेत.
 
करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू
 


अभिनेता करणसिंह ग्रोव्हर एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा लग्नबंधनात अडकला आहे. आपल्या आकर्षक व्यक्तीमत्त्वामुळे करणसिंहनं कायमच सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या.त्यामुळेच की काय त्याच्या नायिकाही त्याच्यावर फिदा झाल्या. त्यामुळेच 2008 साली त्यानं श्रद्धा निगम हिच्याशी लग्न केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. दहा महिन्यांत दोघांच्या नात्याला पूर्णविराम लागला. यानंतर करणनं 2012 साली त्याची सहनायिका जेनिफर विंगेटशी लग्न केलं. मात्र करण आणि जेनिफरचं नातंही फार काळ टिकलं नाही. यानंतर करणच्या आयुष्यात एंट्री झाली ती बंगाली बाला बिपाशा बासूची. दोघांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघंही लग्नबंधनात अडकले. सध्या दोघंही एकत्र संसार करतायत.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :