see pics : होय, आयशा टाकिया दिसतेयं हॉट!

ट्रोल करणा-यांना घाबरण्याऐवजी आयशा टाकियाने त्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. तेही एक फोटोशूट करून. होय, या फोटोशूटमध्ये आयशा कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय.

see pics : होय, आयशा टाकिया दिसतेयं हॉट!
Published: 13 Mar 2017 04:27 PM  Updated: 13 Mar 2017 04:27 PM

आयशा टाकिया हिने अलीकडे लिप सर्जरी केली़ या सर्जरीमुळे आयशाला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावे लागले. पण याची पर्वा करणार ती आयशा कुठली? ट्रोल करणा-यांना घाबरण्याऐवजी आयशाने त्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. तेही एक फोटोशूट करून. होय, या फोटोशूटमध्ये आयशा कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय.काही दिवसांपूर्वी आयशा मुंबई येथे एका रेस्टॉरंट लॉचिंग कार्यक्रमात पती फरहान आजमी याच्यासोबत बघावयास मिळाली होती.या इव्हेंटमधील आयशाचे काही फोटो सोशल मीडियावर येताच नेटिझन्सने तिच्या लूकवरून ट्रोल करायला सुरुवात केली होती़ आयशाचे ओठ सुजलेले असल्याचे बघावयास मिळत असून, चेहरा पूर्णत: प्लॅस्टिकचा दिसत आहे. आता आयशा स्वत:ला आरशात बघण्याची हिंमत करणार काय? अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या कमेण्ट शेअर केल्या गेल्या होत्या. या कमेण्टवर आयशानेही खरमरीत उत्तर दिले होते़  तुम्ही कितीही चांगले असला तरी, काही लोक तुमच्यातील खोड आणि कमतरता काढण्याचा प्रयत्न करतीलच, अशा शब्दांत तिने ट्रोल करणा-यांना सुनावले होते.आयशा चित्रपटात येण्यासाठी उत्सूक आहे. आपल्या कमबॅकसाठी आयशाने जोरदार तयारी चालवली असल्याचे कळते. गतवर्षी आयशाने एक म्युझिक व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ लवकरच रिलीज होणार आहे. कदाचित याचसाठी आयशाने ही सर्जरी केली असावी. ही सर्जरी करणारी आयशा एकटी अभिनेत्री नाही. अशा सर्जरीनंतर अनेक अभिनेत्रींच्या चेहºयात बदल झालाय. अनुष्का शर्मा त्यापैकीच एक़ अनुष्काने ओठांची सर्जरी केली होती, तेव्हा तिच्या  बदललेल्या लूकची बरीच टर उडवली गेली होती.आयशाने वयाच्या पंधरा वर्षांपासून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. हिंदी चित्रपटांशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही ती दिसली होती. सलमानसोबत ‘वॉन्टेड’ अािण अजय देवगणसोबत ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटात आयशा झळकली होती. यानंतर २००९ मध्ये आयशाने लग्नाचा निर्णय घेतला व २०११ मध्ये चित्रपटांना रामराम ठोकला. त्यावर्षी ‘मोड’ या चित्रपटात आयशाच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. पण आता आयशा पुन्हा एकदा चित्रपटात परतण्यासाठी सज्ज झाली आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :