खूशखबर ! ‘नमक हलाल’ पुन्हा रिलीज होणार!!

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील स्टारर ‘नमक हलाल’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतो? आठवत नसेल तर तुम्ही तो पुन्हा पाहू शकता. टीव्ही वा हॉटस्पॉटवर नाही, तर चित्रपटगृहांत जावून. होय, ‘नमक हलाल’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे.

खूशखबर ! ‘नमक हलाल’ पुन्हा रिलीज होणार!!
Published: 19 May 2017 03:27 PM  Updated: 20 May 2017 01:21 PM

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील स्टारर  ‘नमक हलाल’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतो? आठवत नसेल तर तुम्ही तो पुन्हा पाहू शकता. टीव्ही वा हॉटस्पॉटवर नाही, तर चित्रपटगृहांत जावून. होय, ‘नमक हलाल’ हा चित्रपट  पुन्हा एकदा चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या दर्दी प्रेक्षकांसाठी ही निश्चितपणे आनंदाची बातमी आहे. 
 ‘नमक हलाल’ हा चित्रपट रिलीज होऊन ३५ वर्षे झालीत. याच मुहूर्तावर हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. थिएटर आॅन डिमांड सर्व्हिस आणि शेमारू एंटरटेनमेंटने हा चित्रपट पुन्हा एकदा देशभर रिलीज करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. येत्या २१ मे रोजी  ‘नमक हलाल’ची स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे.  पाश्चिमात्य देशात  विशेष गाजलेले सिनेमे नव्याने रिलीज करण्याचा प्रघात आहे. आता भारतातही हाच ट्रेंड येऊ पाहतो आहे.   थिएटर आॅन डिमांड सर्व्हिस आणि शेमारू एंटरटेनमेंट हा ट्रेंड आणू पाहत आहे. नव्या पिढीला देशातील क्लासिक चित्रपटांची ओळख करून देणे, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
‘नमक हलाल’मधील अमिताभचा ‘आई कॅन टॉक इंग्लिश..आई कॅन वॉक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज वेरी फनी लैंग्वेज...’ हा डायलॉग कमालीचा गाजला होता. शिवाय ‘पग घुंगरू ’ आणि ‘आज रपट जाए तो’ ही चित्रपटाची गाणीही तुफान लोकप्रीय झाली होती. आता या गाण्यांची जादू पुन्हा एकदा प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :