leaked : ​लग्नाच्या दोन महिन्यांआधीच लिक झाली नागार्जुनच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका!

येत्या ६ व ७ आक्टोबरला साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समन्था या दोघांचा ग्रॅण्ड लग्नसोहळा होणार आहे. पण त्याआधीच चैतन्य व समन्थाच्या लग्नाची पत्रिका लिक झाली आहे.

leaked : ​लग्नाच्या दोन महिन्यांआधीच लिक झाली नागार्जुनच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका!
Published: 11 Aug 2017 01:52 PM  Updated: 11 Aug 2017 01:52 PM

साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा व अभिनेता नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री  समन्था हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याचवर्षी जानेवारीत चैतन्य व  समन्था या दोघांचा साखरपुडा झाला होता. येत्या ६ व ७ आक्टोबरला गोव्यात या दोघांचा ग्रॅण्ड लग्नसोहळा होणार आहे. पण त्याआधीच म्हणजे उण्यापुºया दोन महिन्यांपूर्वीच चैतन्य व  समन्थाच्या लग्नाची पत्रिका लिक झाली आहे. सूत्रांचे मानाल तर, अद्याप पत्रिका कुणालाच वाटल्या गेल्या नाहीत. त्यामुळे प्रिंटरकडूनच ती लिक झाली आहे.



या वेडिंग कार्डातील एक खास गोष्ट म्हणजे, यावर नागार्जुन व त्याची पत्नी अमला या दोघांसोबतच चैतन्यची ‘बायोलॉजिकल’ आई लक्ष्मी हिचेही नाव आहे. लक्ष्मी नागार्जुनची पहिली पत्नी आहे. ती डी. रामानायडू यांची मुलगी आणि सुरेश बाबू व व्यंकटेशची बहीण आहे. लक्ष्मीला घटस्फोट दिल्यानंतर नागार्जुनने १९९२ मध्ये अमलासोबत लग्न केले होते. लक्ष्मी व नागार्जुन यांचा मुलगा चैतन्य सध्या पित्यासोबतच राहतो. मात्र त्याच्या लग्नाची संपूर्ण तयारी आई लक्ष्मी आणि मामेभाऊ राणा डुग्गुबती हे दोघे करताहेत. चैतन्य व समंथा यांच्या या ग्रॅण्ड वेडिंगसाठी गोव्यातील एक हॉटेल बुक करण्यात आले आहे.



ALSO READ : ​नागार्जुनच्या ‘बोल्ड’ सूनेचे ‘बोल्ड’ विधान! म्हणे, जेवणापेक्षा सेक्स अधिक आवडेल!!

चैतन्य व समन्था यांची पहिली भेट गौतम वासुदेव मेनन यांच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटादरम्यान झाली होती. ‘ये माया चेसावे’ हा एक रोमॅन्टिक चित्रपट होता. या चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम बहरले. यानंतर ‘आॅटोनगर सूर्या’ आणि ‘मनम’ यासारख्या चित्रपटांत चैतन्य व समन्था हे दोघे एकत्र दिसले. गतवर्षी चैतन्य व समन्था या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र आम्ही दोघे केवळ चांगले मित्र आहोत, असे सांगून समन्थाने या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. सिनेसृष्टीत माझा सर्वांत जवळचा आणि चांगला मित्र कोण असेल तर तो चैतन्य आहे, असे ती म्हणाली होती. अर्थात हाच चांगला मित्रचं समन्थाचा ‘जीवनसाथी’ होणार आहे, हे मात्र तिने दडवून ठेवले होते. 


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :