क्रिती सॅननची एकच इच्छा; सुशांतला मिळावा बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अवार्ड!

बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अवार्ड आपल्या बॉयफ्रेन्डला अर्थात सुशांत सिंह राजपूतला मिळावा, असे मत क्रितीने बोलून दाखवले आहे.

क्रिती सॅननची एकच इच्छा; सुशांतला मिळावा बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अवार्ड!
Published: 16 Apr 2017 03:51 PM  Updated: 16 Apr 2017 03:51 PM

बॉलिवूडला सध्या यंदाच्या आयफा अवार्डचे वेध लागले आहेत. येत्या जुलै महिन्यात न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा रंगणार आहे. सध्या या पुरस्कारासाठी वोटिंग सुरु आहे.  अनिल कपूर, विकी कौशल, चंकी पांडे अशा अनेकांनी वोटींग प्रक्रिया पूर्ण केली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॅन हिनेही आपला आवडता अभिनेता, आवडती अभिनेत्री आणि आवडता चित्रपट अशा तीन विभागात मत दिले. आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट आयफा अवार्डच्या फायनल लिस्टमध्ये नसेल तर तो माझ्यासाठी धक्का असेल, असे क्रिती यावेळी म्हणाली.

बेस्ट अ‍ॅक्टर आणि बेस्ट अ‍ॅक्ट्रेसबद्दलही क्रिती एकदम कॉन्फिडन्ट दिसली. होय, क्रितीच्या मते, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दुस-या कुणाला नाही तर आलिया भट्ट हिलाच मिळायला हवा. ‘उडता पंजाब’मध्ये आलियाने अप्रतिम काम केलेय आणि त्यामुळे ती या पुरस्काराची खरी दावेदार आहे, असे क्रितीचे मत आहे. आता उरली गोष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची. तर हा पुरस्कार आपल्या बॉयफ्रेन्डला अर्थात सुशांत सिंह राजपूतला मिळावा, असे मत क्रितीने बोलून दाखवले आहे. महेन्द्र सिंह धोनीच्या बायोपिकसाठी सुशांतला बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अवार्ड मिळावा, असे क्रितीने म्हटले आहे. म्हणजेच, बेस्ट अ‍ॅक्टरसाठी क्रितीचे वोट सुशांतच्या खात्यात गेले आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, केवळ क्रितीनेच नाही तर सुशांतनेही स्वत:लाच मत दिले आहे.
क्रिती सॅनन व सुशांत सिंह राजपूत या दोघांचा ‘राबता’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. क्रिती आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये आहेत, ही बाब कुणापासूनही लपून राहिलेली नाही. अर्थात  दोघांनीही  याचा कायम इन्कारच केला आहे. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :