​ ‘ही’ व्यक्ती आहे,जस्टीन बीबरच्या यशाची शिल्पकार; ‘या’ व्हिडिओने जस्टीनला बनवले स्टार!!

२३ वर्षांचा जस्टीन बीबर आज संपूर्ण जगासाठी एक आख्यायिका झाला आहे. जगभरात त्याची जबरदस्त फॅन फॉलोर्इंग आहे. पण कदाचित जस्टीनच्या या अभूतपूर्व यशाची शिल्पकार कोण व्यक्ति आहे, हे तुम्हाला ठाऊक नसावे.

​ ‘ही’ व्यक्ती आहे,जस्टीन बीबरच्या यशाची शिल्पकार; ‘या’ व्हिडिओने जस्टीनला बनवले स्टार!!
Published: 10 May 2017 12:07 PM  Updated: 10 May 2017 12:07 PM

२३ वर्षांचा जस्टीन बीबर आज संपूर्ण जगासाठी एक आख्यायिका झाला आहे. जगभरात त्याची जबरदस्त फॅन फॉलोर्इंग आहे. पण कदाचित जस्टीनच्या या अभूतपूर्व यशाची शिल्पकार कोण व्यक्ति आहे, हे तुम्हाला ठाऊक नसावे. जस्टीन आज जिथे कुठे आहे. त्यामागे त्याची आई पेंटी मॅलेटी हिचे मोठे योगदान आहे. जस्टीन केवळ १२ वर्षांचा असताना सहज एक गाणे गुणगुणत होता. जस्टीन सोफ्यावर बसून गात होता आणि त्याची आई स्वत:च्या  मोबाईल कॅमेºयाने त्याचा व्हिडिओ शूट करत होती. यानंतर जस्टीनच्या आईने अगदी गमती-गमतीत हा व्हिडिओ यु-ट्युबवर शेअर केला आणि बघता बघता जस्टीन कमालीचा लोकप्रीय झाला.खरे तर बिझनेसमॅन स्कूटर ब्रॉन काही नवे सिंगींग टॅलेंटचा शोध घेत होते. याचसाठी यूटयूवरचे व्हिडिओ पाहण्याचा धडका त्यांनी लावला होता. याचदरम्यान जस्टीनचा त्याच्या आईने अपलोड केलेला हा व्हिडिओ त्यांनी बघितला. मग काय, जस्टीनला शोधण्यासाठी त्यांनी आकाश-पाताळ एक केले. अखेर स्कूटर ब्रॉनला जस्टीनला शोधण्यात यश आले. पुढची सगळी कथा संपूर्ण जगाला ठाऊक आहे. २००७ मध्ये क्रिश ब्राऊनचा हिट नंबर ‘विद यू’ जस्टीनने गायले आणि यूटयूबवर सगळ्यांना स्वत:चे फॅन बनवले. हा ‘सिलसिला’ आजपर्यंत सुरु आहे.  जस्टीन आज एक इंटरनॅशनल सिंगर आणि युथ सेंसेशन बनला आहे. जस्टीनच्या आईने दहा वर्षांपूर्वी अपलोड केलेला हाच व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

आज रात्री मुंबईत जस्टीनचा लाईव्ह शो होणार आहे. या शोसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जस्टीन भारतात अगदी शाही पाहुणचार उपभोगणार आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :