​आयफाच्या मंचावर ‘जोक्स’वर ‘जोक्स’! कंगना राणौत देणार का उत्तर?

आयफा अवार्ड होस्ट करणारे सैफ अली खान व करण जोहर या दोघांनी कंगना राणौतला डिवचायची एकही संधी सोडली नाही. खरे तर सैफ व करण या दोघांनी प्रत्येकालाच लक्ष्य केले. पण कंगनाची त्यांनी आयफाच्या मंचावर जी काही टर उडवली ती ऐकून शांत बसणा-यांपैकी कंगना नाहीच.

​आयफाच्या मंचावर ‘जोक्स’वर ‘जोक्स’! कंगना राणौत देणार का उत्तर?
Published: 17 Jul 2017 11:24 AM  Updated: 17 Jul 2017 11:24 AM

न्यूयॉर्कमध्ये तीन-चार दिवसांपासून रंगलेला ‘आयफा अवार्ड2017’ सोहळा संपला. पण शेवटी संपला म्हटल्याने संपणार थोडीच. होय, या सोहळ्यात काही भूवया उंचावणाºया अन् अनेकांना डिवचणा-या गोष्टीही झाल्यात. आता या गोष्टींची चर्चा येथून पुढे आणखी काही दिवस तर व्हायलाच हवी ना? आता हेच बघा, शाहिद कपूरला ‘उडता पंजाब’साठी बेस्ट अ‍ॅक्टरचे अवार्ड मिळाल्या-मिळाल्या सुशांतसिंह राजपूतला मिरच्या झोंबल्या. इतक्या की, यावर त्याने शाहिदला डिवचणारे टिष्ट्वट करून टाकले. दुसरीकडे आयफा अवार्ड होस्ट करणारे सैफ अली खान व करण जोहर या दोघांनी कंगना राणौतला डिवचायची एकही संधी सोडली नाही. खरे तर सैफ व करण या दोघांनी प्रत्येकालाच लक्ष्य केले. पण कंगनाची त्यांनी आयफाच्या मंचावर जी काही टर उडवली ती ऐकून शांत बसणा-यांपैकी कंगना नाहीच. कंगना या सोहळ्याला नव्हती. पण नेपोटिझम वादावरून सैफ व करणने तिला लक्ष्य करण्यात कुठलीच कसर सोडली नाही.ALSO READ : कंगना राणौतने पुन्हा चोळले करण जोहरच्या जखमेवर मीठ!!

नेपोटिझमवरून कंगना व करण या दोघांमधला वाद अद्यापही शमलेला नाही, हे तुम्हाला ठाऊक नाहीच. करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. तेव्हापासून या मुद्यावर करण व कंगना या दोघांमध्ये चांगलीच तणाताणी सुरु आहे. नेमक्या याचवरून सैफ व करण दोघांनीही कंगनाला डिवचले. नेपोटिझम रॉक्स...नेपोटिझम रॉक्स...असे जोरजोरात ओरडण्यापासून तर यावरच्या जोक्सपर्यंत असे सगळे काही दोघांनी केले. वरूण धवनला बेस्ट अ‍ॅक्टर इन कॉमिक रोलचा अवार्ड मिळाल्यावर करण जोहर कंगनाला लक्ष्य करताना दिसला. ‘मी माझ्या वडिलांमुळे इथे आहे, सैफ त्याच्या आईमुळे  तर वरूण आपल्या वडिलांमुळे...व्हॉट अ बिग डिल?’,असे तो म्हणाला. हाच धागा पकडून सैफ ‘बोले चूडियां, बोले कंगना...’ असे गाऊ लागला. यावर करणला आणखीच जोर चढणारच. ‘कंगना बोलतही ही क्यों है’, असे तो म्हणाला.  
करण व सैफने आयफाच्या मंचावर इतके डिवचल्यानंतर आता कंगना यावर काय उत्तर देते, हे पाहणे रोचक असणार आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :