Don't Miss : ​गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘हटके’ प्रश्नांना, कंगना राणौतचे ‘हटके’ उत्तर!!

कंगनाने स्वत:ची पर्सनल लाईफ कधीच लपवून ठेवली नाही. ‘आप की अदालत’नंतर अन्य एका मुलाखतीतही तिने हेच केले. स्वत:बद्दलच्या अनेक पर्सनल प्रश्नांना तिने उत्तरे दिलीत.

Don't Miss : ​गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘हटके’ प्रश्नांना, कंगना राणौतचे ‘हटके’ उत्तर!!
Published: 12 Sep 2017 11:13 AM  Updated: 12 Sep 2017 11:13 AM

कंगना राणौतचा ‘सिमरन’ हा आगामी सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत रिलीज होतो आहे. त्यामुळे सध्या कंगना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अर्थात ‘सिमरन’पेक्षा कंगनाच्या पर्सनल लाईफचीच सध्या अधिक चर्चा सुरु आहे. अलीकडे कंगना ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आली आणि या कार्यक्रमात आपल्या आयुष्याची अनेक पाने तिने वाचून दाखवलीतं. अगदी आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि हृतिक रोशनच्या रिलेशनशिपपर्यंत ती बोलली. तिची ही मुलाखत चांगलीच वादग्रस्त ठरली, हे सांगायला नकोच. अर्थात याऊपरही कुणाला जुमानेल ती कंगना कसली. कंगनाने स्वत:ची पर्सनल लाईफ कधीच लपवून ठेवली नाही. ‘आप की अदालत’नंतर अन्य एका मुलाखतीतही तिने हेच केले. स्वत:बद्दलच्या अनेक पर्सनल प्रश्नांना तिने उत्तरे दिलीत. या प्रश्नांचे वैशिष्ट्य म्हणजे, कंगनाच्या आयुष्याशी निगडीत हे प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च झाले होते. कंगनाचे शिक्षण, तिचे लग्न, ड्रिंक-स्मोक यासारख्या अतिशय खासगी प्रश्नांचा यात समावेश होता. कंगनाने कुठलेही आढेवेढे न घेता या ‘गुगल्ड’ प्रश्नांची उत्तरे दिली. तेही अगदी बेधडक़
ही प्रश्न कोणते आणि त्यावर कंगनाने काय उत्तर दिले, ते आपण जाणून घेऊ यात...

प्रश्न 1 - कंगना कुणासोबत लग्न करणार?
कंगना - हसबण्डशी

प्रश्न -कंगना एका चित्रपटासाठी किती फीस घेते?
कंगना - जितकी मला चित्रपटासाठी मिळते.

प्रश्न - कंगनाच्या हेअरस्टाईलचे नाव काय?
कंगना - कुणी याला नूडल्स म्हणते तर कुणी कर्ली.

प्रश्न - कंगनाच्या इंग्लिश टीचरचे नाव काय?
कंगना - हा चांगला प्रश्न आहे. माझ्या इंग्लिश टीचरचे नाव आहे पूजा अशर. इंग्लिशमध्ये धडपडणारे तिच्याकडे शिकू शकतात.

प्रश्न - कंगना ड्रिंक व स्मोक करते काय?
कंगना - आधी करायचे. आता मी ड्रिंक व स्मोक करत नाही.

ALSO READ : ​अखेर आदित्य पांचोली बोललाच!! म्हणे, कंगना राणौत झाली वेडी!

प्रश्न - कंगनाचा फोन नंबर काय?
कंगना - मी माझा नंबर देऊ शकत नाही. पण एकजण मला बोगस कॉल करायचा. त्याचा दिला असता. पण त्याचा तो नंबरही मला आता आठवत नाही.

प्रश्न - कंगनाला काळी जादू येते?
कंगना : मला मॅजिक येते आणि मी ब्रॉऊन आहे. मला ब्लॅक मॅजिकऐवजी ब्राऊन मॅजिक येते असे तुम्ही म्हणू शकता.

प्रश्न - कंगनाला वाद का आवडतात?
कंगना - कारण मी वादग्रस्त आहे.

प्रश्न - कोण खोटं बोलतयं, कंगना की हृतिक रोशन?
कंगना - तुम्हासगळ्यांनाच ठाऊक आहे.

प्रश्न - कंगनाला स्वयंपाक येतो?
कंगना : मी बनवू शकते पण रक्त सांडवल्याशिवाय नाही.

प्रश्न : रिलीजपूर्वी कंगना वाद का उखरून काढते?
कंगना - कारण हे रिलीज आहे. त्यामुळे माझ्या भावनाही रिलीज होतात.

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :