...या बॉलिवूड अभिनेत्रींसाठी ‘साउथ डेब्यू’ ठरला सक्सेसफूल फॉर्म्युला!

जयाप्रदाच्या करिअरची खरी सुरुवात ही साउथमधून झाली होती. जयाप्रमाणे बॉलिवूडमधील इतरही काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी साउथमधून डेब्यू करीत बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...

...या बॉलिवूड अभिनेत्रींसाठी ‘साउथ डेब्यू’ ठरला सक्सेसफूल फॉर्म्युला!
Published: 04 Apr 2017 02:58 PM  Updated: 04 Apr 2017 02:58 PM

अभिनेत्री तथा राजकारणी जयाप्रदा यांनी नुकताच त्यांचा ५५वा वाढदिवस सेलिब्रेट केला. ३ एप्रिल १९६२ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथे जन्मलेल्या जया यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. परंतु त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली. वयाच्या १४व्या वर्षी जयाला शाळेतील डान्स प्रोग्रॅममध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली होती. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या एका दिग्दर्शकास जयाचा डान्स खूपच भावला होता. त्यामुळे त्यांनी ‘भूमी कोसम’ या चित्रपटात जयाला डान्सची संधी दिली. यासाठी जयाला दहा रुपये मानधनही मिळाले होते. केवळ तीन मिनिटांच्या या परफॉर्मन्समध्ये जया यांनी असा काही जलवा दाखविला होता की, साउथमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या प्रेमात पडले होते. तेथूनच त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली. पुढे जयाने बॉलिवूडमध्ये १९७९ साली ‘सरगम’मधून एंट्री केली. १९८२ मध्ये आलेल्या ‘कामचोर’ या चित्रपटाने अशी काही धूम उडवून दिली होती की, जयाला थेट टॉपच्या अभिनेत्रींमध्ये संधी मिळाली. मात्र जयाच्या करिअरची खरी सुरुवात ही साउथमधून झाली होती. जयाप्रमाणे बॉलिवूडमधील इतरही काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी साउथमधून डेब्यू करीत बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...दीपिका पादुकोण 
सगळ्यांनाच माहिती आहे की, दीपिका पादुकोणने २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. मात्र तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात ही २००६ पासूनच सुरू झाली होती. तिने ‘ऐश्वर्या’ या साउथ चित्रपटातून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. आज दीपिका बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. प्रियंका चोपडा
जगातील दुसºया क्रमांकाची सुंदर महिला म्हणून नुकताच बहुमान मिळालेल्या बॉलिवूडच्या ‘देशी गर्ल’ने साउथमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. २००२ मध्ये आलेल्या ‘थमिजन’ या चित्रपटातून तिने अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर २००३ मध्ये आलेल्या ‘द हिरो’मध्ये ती झळकली. पुढे याच वर्षात आलेल्या ‘अंदाज’मध्ये ती मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. आज प्रियंका बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये जबरदस्त प्रसिद्ध आहे. ऐश्वर्या राय-बच्चन
सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन हिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र तिने ‘इरुकर’ (जानेवारी १९९७) या साउथ चित्रपटातून डेब्यू करीत आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. पुढे याच वर्षी तिने आॅक्टोबरमध्ये आलेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 


असिन थोत्तुमकल
असिनने २००१ मध्ये ‘नरेंद्रन मकान जयकांतन वाका’ या साउथ चित्रपटातून डेब्यू करीत आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या व्यतिरिक्त तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये कामं केले. पुढे २००८ मध्ये आलेल्या ‘गजनी’मधून तिने बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.सयामी खेर
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्जिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया सयामीने साउथमधून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. २०१५ मध्ये आलेल्या ‘रे’ या साउथ चित्रपटात ती झळकली होती. याचा तिला बॉलिवूडमध्ये खूप फायदा झाल्याचे तिने स्पष्ट केले होते. क्रिती सॅनन

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने तिच्या करिअरची सुरुवात साउथ इंडस्ट्रीतून केली. २०१४ मध्ये तिने ‘नेनोक्कडीने’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. पुढे याचवर्षी तिने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाउल ठेवले. कमीतकमी वेळात ती बॉलिवूडमध्ये पॉप्युलर झाली. उर्मिला मातोडकर
‘रंगीला’गर्ल उर्मिला मातोडकर हिनेदेखील साउथमधूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. १९८९ मध्ये तिने ‘चाणक्य’ या साउथ चित्रपटातून डेब्यू केला. पुढे १९९१ मध्ये तिने ‘नरसिम्हा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :