Forgotten Actresses : ...आपण यांना पाहिलंत का?

एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया या अभिनेत्रींची एक्झिट मात्र त्यांच्याकरिता खूपच मारक ठरली आहे. काहींना तर प्रेक्षक विसरलेदेखील आहेत. त्यामुळे यांच्याबाबतीत आपण यांना पाहिलंत का? असा प्रश्न जर उपस्थित केला तर वावगे ठरू नये.

Forgotten Actresses : ...आपण यांना पाहिलंत का?
Published: 29 Mar 2017 04:24 PM  Updated: 29 Mar 2017 04:26 PM

बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळणे सोपे नाही. कारण एक ब्रेक मिळविण्यासाठी प्रचंड स्ट्रगल, वशिलेबाजी अन् गॉडफादर अशा सर्वच फंडांचा आधार घ्यावा लागतो; मात्र जर तुम्हाला बॉलिवूडमधून बाहेर पडायचे असेल तर त्यास कुठल्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. काही महिने जरी तुम्ही बॉलिवूडमधून एक्झिट घेतली तरी, लोक तुम्हाला विसरून जातात. अशातही जर तुम्हाला पुन्हा वापसी करायची असेल तर सुरुवातीसारखेच हेलपाटे खाण्याशिवाय गत्यंतर नसते. सध्या अशीच परिस्थिती काही बॉलिवूड अभिनेत्रींबाबत घडत आहे. एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया या अभिनेत्रींची एक्झिट मात्र त्यांच्याकरिता खूपच मारक ठरली आहे. काहींना तर प्रेक्षक विसरलेदेखील आहेत. त्यामुळे यांच्याबाबतीत आपण यांना पाहिलंत का? असा प्रश्न जर उपस्थित केला तर वावगे ठरू नये. अमिषा पटेल
‘कहो ना प्यार है’, ‘गदर’, ‘क्या यहीं प्यार है’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अमिषा पटेल सध्या इंडस्ट्रीमधून गायबच झाली आहे. करिअरची धमाकेदार सुरुवात करूनही अमिषाला त्यात सातत्यता ठेवणे शक्य झाले नाही. अमिषाने ‘आप मुझे अच्छे लगने लगे’, ‘हमराज’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, भूल भुलय्या’, ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’, ‘रेस’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले; मात्र अशातही ती स्वत:चा दबदबा निर्माण करण्यात अयशस्वी ठरली. सध्या अमिषा बॉलिवूडमध्ये पुन्हा एंट्री करण्यासाठी धडपड करीत आहे. सेलिना जेटली

मिस इंडिया असलेली सेलिना जेटली हिची बॉलिवूडमधील एंट्री फारशी धमाकेदार नसली तरी, तिला अल्पावधीत मिळालेल्या चित्रपटांच्या आॅफर्स बघता ती बॉलिवूडमध्ये इतरांसाठी आव्हान निर्माण करेल असेच काहीसे चित्र दिसत होते. २००३ मध्ये आलेल्या ‘जानशीन’, ‘खेल’ या चित्रपटांमध्ये सेलिनाचा जलवा बघण्यासारखा होता. त्यानंतर ती ‘सिलसिले’ (२००५), ‘नो एंट्री’ (२००५), ‘अपना सपना मनी मनी’ (२००६), ‘पेइंग गेस्ट’ (२००९) आदि चित्रपटांमध्ये सेलिनाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली; मात्र २०११ मध्ये तिने बॉयफ्रेंड आणि आॅस्ट्रेलियन बिझिनेसमॅन पीटर हॉग याच्याशी लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीला एकप्रकारे बाय-बाय केला. सध्या सेलिना ‘विराज आणि विन्स्टन’ नावाच्या दोन जुळ्या मुलांची आई आहे.अमृता अरोरा
२००२ मध्ये आलेल्या ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून डेब्यू केलेल्या अमृता अरोरा हिलादेखील बॉलिवूडमध्ये स्थिर होता आले नाही. ‘आवारा पागल दिवाना’, ‘ एक और एक ग्यारह’, ‘गर्लफ्रेंड’, ‘रामा रामा क्या है ड्रामा’, ‘हिरोज’, ‘कमबख्त इश्क’ आदि चित्रपटांमध्ये अमृता झळकली आहेर्; मात्र अशातही तिला बॉलिवूडमध्ये लांब पल्ला गाठता आला नाही. अखेर २००९ मध्ये शकील लडक या बिझिनेसमॅनशी लग्न करून तिने एकप्रकारे बॉलिवूडमधून एक्झिटच घेतली आहे. अमृताला दोन मुले आहेत. शमिता शेट्टी
‘मोहब्बते’ (२०००) या चित्रपटातून डेब्यू केलेल्या शमिता शेट्टीला आज प्रेक्षक विसरले असतील असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण शमिता चित्रपटांमधून जणू काही हद्दपारच झाली आहे. ‘फरेब’, ‘जहर’, ‘कॅश’ या चित्रपटांबरोबरच शमिता ‘झलक दिखलाजा रीलोडेड’ आणि ‘बिग बॉस सीझन-३’ मध्ये झळकली होती. त्यानंतर मात्र ती इंडस्ट्रीमधून गायबच झाली आहे. तनुश्री दत्ता 
‘आशिक बनाया गर्ल’ तनुुश्री दत्ता तर पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परतणार की नाही, याविषयी शंकाच आहे. २००४ मध्ये फेमिना मिस इंडियाचे टायटल जिंकणारी तनुश्री सध्या संसाराच्या वाटेवर आहे. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून सक्सेसफूल डेब्यू केल्यानंतरही तनुश्रीला बॉलिवूडमध्ये स्थिर होता आले नाही. प्रीति झंगियानी
शमिता शेट्टी आणि प्रीति झंगियानी यांनी बॉलिवूडमध्ये ‘मोहब्बते’ या चित्रपटातून एकत्रच डेब्यू केला होता. पुढे दोघीही ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटात झळकल्या; मात्र दोघींचेही करिअर फार काळ टिकले नाही. प्रीती ‘आन : मेन अ‍ॅट वर्क’, ‘जाने होगा क्या’, ‘चांद के पार चलो’ या चित्रपटांमध्ये झळकली. पुढे प्रीतीने अभिनेता प्रवीण डबास याच्याशी विवाह केला. सध्या प्रीतीला एक मुलगा असून, वैवाहिक जीवनाचा ती आनंद घेत आहे. किम शर्मा

किमनेही ‘मोहब्बते’मधूनच डेब्यू केला. पुढे ती ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘नहले पे दहला’, ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु तिला अधिक काळ बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करता आले नाही. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :