बिपाशा बासूचा फिटनेस फंडा

बॉलिवूडमधली गॉर्जिअस अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या सुंदर फिगरसाठी फेमस आहे. ही फिगर मेंटेंट करण्यासाठी बिपाशा दररोजच वर्कआऊट करत.े

बिपाशा बासूचा फिटनेस फंडा
Published: 25 Apr 2017 11:58 AM  Updated: 25 Apr 2017 11:58 AM

बिपाशी बासूसध्या सलमान खानसोबत 'द बँग टूर’आहे. या टूरमध्ये ती सध्या चांगलीच व्यस्त आहे मात्र यात ही वर्कआऊट करणे चुकवत नाही. बिपाशा कधीच तिचे कामाचे शेड्युल वर्कआऊटच्यामध्ये येऊन देत नाही. त्यामुळेच ही गॉर्जिअस अभिनेत्री आपल्या सुंदर फिगर बॉलिवूडमध्ये फेमस आहे. बीपाशा कधीच आपली वर्कआऊटच्या वेळा चुकवत नाही. तसेच तिच्या दिनचर्येत ती कोणताही फेरबद्दल करत नाही एवढेच काय तिने तिच्या सहकार्यांना सुद्धा व्यायामाची सवय लावली आहे. बिपाशा आपल्या आयुष्यात वर्कआऊटला प्रथम प्राध्यान देते .बिपाशाने आपल्या आकर्षक फिगर ने इंडस्ट्रीत आणि अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.  बिपाशा सध्या ऑस्ट्रेलियात आहे. सिडनीमध्ये ती तिच्या शोची रिहर्सल करतेय. दिवसांतून जवळपास 12 ते 14 तास ती काम करते हे करत असतानासुद्धा ती वर्कआउट करण्याचे विसरत नाही किंवा टाळतसुद्धा नाही. बिपाशा म्हणते ''मी माझे वेळापत्रक पूर्णपणे पाळते वेळेवर झोपणे लवकर उठणे हे मी चुकवत नाही माझा शो असला तरीही. मी कितीही थकली असली तरीही मी ब्रिथिंग एक्सरसाईझ, स्ट्रेचिंग मी नियमित करते. मला आधीच गुढघे दुखीचा त्रास आहे त्यामुळे मला अजून काही दुखापत होऊ नये म्हणून मी नेहमी माझ्याजवळ आईस पॅक बाळगते.

बिपाशासह  सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, बादशाह आणि डेजी शाहसुद्धा सलमान खानच्या या 'द बँग टूर’मध्ये सहभागी आहेत.या टूरच्या माध्यमातून सलमान बºयाच कालावधीनंतर लाइव्ह ऑडियन्सच्या समोर परफॉर्मन्स करतोय आहे.  


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :