'या' आजाराने त्रस्त आहे बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण , चित्रपट साईन करण्यास देतेय नकार

सध्या बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नानंतर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या लग्नाची. मीडिया रिपोर्टनुसार सध्या दीपिका पादुकोण नवे चित्रपट साईन करत नाही आहे.

'या' आजाराने त्रस्त आहे बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण , चित्रपट साईन करण्यास देतेय नकार
Published: 23 May 2018 10:16 AM  Updated: 23 May 2018 10:17 AM

सध्या बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नानंतर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या लग्नाची. मीडिया रिपोर्टनुसार सध्या दीपिका पादुकोण नवे चित्रपट साईन करत नाही आहे.  पद्मावतनंतर दीपिकाने इरफान खानसोबत सपना दीदी हा चित्रपट साईन केला आहे. मात्र इरफान आजारी असल्याने या चित्रपटाचे शूटिंग रखडले आहे.  पण यानंतर दीपिका चित्रपटांच्या ऑफर स्वीकारत नाही आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येतायेत.

रिपोर्टनुसार दीपिकाच्या खांदा आणि मानेच्या दुखण्यामुळे नवीन चित्रपट साईन करत नाहीय. अंग दुखीच्या या आजारामुळे तिने अनेक नवीन चित्रपट करण्यास नकार दिला आहे. दीपिका लग्नासाठी आपल्या करिअरमध्ये अंतर देणाऱ्यातली तरी नाही.

सध्या बीटाऊनमध्ये दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. नोव्हेंबरमध्ये दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाचा मुहूर्त ठरवल्याची देखील चर्चा आहे. लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी  दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्ना दरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लग्नाची तारीख नोव्हेंबरमध्येच ठरली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे.  रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. 

ALSO READ :  ​रणबीर कपूरने दिली दीपिका पादुकोणवरच्या प्रेमाची कबुली; व्हिडीओ व्हायरल!


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :