सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा बच्चे कंपनींचीच अधिक चर्चा आहे. आराध्या बच्चन, अबराम खान आणि नितारा कुमार यांच्यानंतर तैमूर अली खान, निशा कपूर या चिमुकल्यांनीही बॉलिवूड जॉइन केल्याने सध्या सेलिब्रिटींपेक्षा यांचीच अधिक चर्चा आहे. त्यातच त्याच्या आई-वडिलांकडून या चिमुकल्यांचे क्यूट फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले जात असल्याने लोक त्यांची झलक बघण्यास आतुर होत आहेत. त्याचबरोबर ‘बाळाचा चेहरा नेमका कोणासारखा दिसतो, मम्मी की पापा!’ अशा चर्चाही रंगत आहेत. अर्थात ही फॅन्ससाठी एकप्रकारची गुत्थी असून, त्याचा आज आम्ही उलगडा करणार आहोत.
तैमूर अली खान - करिना कपूर खान
बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चिमुकला पाहुणा म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान हा होय. ज्याचे प्रत्येकाच्या ओठी नाव आहे. जन्मत:च नवाब बनलेला तैैमूर औश्र कपूर खानदानच्या पाचव्या पिढीचा सदस्य आहे. त्यामुळे तैमूर नेमका कोणावर गेला याविषयी प्रचंड उत्सुकता असली तरी त्याच्या फोटोवरून असे वाटते की, तो मम्मी करिनाची कॉर्बन कॉपी आहे; मात्र करिना म्हणतेय की, तैमूर मम्मी आणि पापा दोघांवरही गेला आहे.
मिशा कपूर - शाहिद कपूर
प्रत्येक वडिलांप्रमाणे शाहिद कपूरही त्याची मुलगी मिशाची प्रचंड काळजी घेतो. त्यामुळेच त्याने तिचा चेहरा अद्यापपर्यंत माध्यमांमध्ये येऊ दिला नव्हता; मात्र आता त्याने मिशाचा एक क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून, त्यात मिशा पापा शाहिदवर गेल्याचे स्पष्टपणे दिसते. तसं बघितलं तर मिशा शाहिद आणि मीरा दोघांवरही गेल्याचे दिसते. परंतु जेव्हा आपण शाहिदचा लहानपणीचा फोटो बघतो, तेव्हा मिशा शाहिदची कार्बन कॉपी वाटते.
नितारा कुमार - अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच मुलगी निताराला मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात; मात्र नुकतेच विमानतळावर निताराचे काही क्यूट फोटो कॅमेºयात कैद झाले. फोटोवरून नितारा पापा अक्षयवर गेल्याचे स्पष्टपणे दिसते. ट्विंकलनेदेखील नितारा अक्षयवर गेल्याचे एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते.
अबराम खान - शाहरूख खान
बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये अबराम खानला रॉकस्टार समजले जाते. कारण बºयाचदा अबराम पापा शाहरूख खानसोबत बघावयास मिळाला आहे. शाहरूखनेदेखील अबरामला कधीच दूर ठेवले नाही. जेथे शक्य होईल तेथे तो अबरामला घेऊन जात असतो. खरं तर अबराम शाहरूखची कमकुवत बाजू समजली जाते. कारण शाहरूख अबरामवर सर्वाधिक प्रेम करतो. अबरामचा मोकळ्या केसातील फोटो बघितला की, शाहरूखला त्याच्या लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
आराध्या बच्चन - ऐश्वर्या राय-बच्चन
आराध्या बच्चन मम्मी आणि पापा दोघांवरही गेली आहे. कारण आराध्याच्या मम्मी पापा म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकचा लहानपणीचा फोटा बघितल्यास तिचा चेहरा दोघांवरही गेल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यातही ऐश्वर्या लहानपणी आराध्यासारखी हुबेहूब दिसायची. या दोघींचा फोटो समोरासमोर ठेवल्यास एकमेकींची कार्बन कॉपी दिसतात.
आजाद रॉव खान - आमीर खान
अबरामप्रमाणेच मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि किरण रॉवचा मुलगा आजाद रॉव खान रॉकस्टार किड्स आहे. अबरामप्रमाणेच आजादचाही जन्म सरोगसी पद्धतीने झाला आहे. आजादचा चेहरा अन् आमीरचा चेहरा यात तिळमात्रही फरक दिसत नाही. दोघांचाही चेहरा गोल असून, डोळे आणि नाक सारखेच आहेत. आमीरचा लहानपणीचा फोटो समोरासमोर ठेवल्यास एकमेकांची कार्बन कॉपी वाटतात.