Interesting : बॉलिवूडचे ‘सीक्रेट अफेयर्स’ तुम्हाला माहित आहेत काय?

​एक काळ असा होता की, बॉलिवूडमध्ये कुठलेही नाते लपविणे अशक्य होते. मात्र सद्यस्थितीत लव्ह अफेयर्स सीक्रेट ठेवणे जणू काही ट्रेंडच बनला आहे.

Interesting : बॉलिवूडचे ‘सीक्रेट अफेयर्स’ तुम्हाला माहित आहेत काय?
Published: 20 Apr 2017 07:18 PM  Updated: 20 Apr 2017 07:29 PM

एक काळ असा होता की, बॉलिवूडमध्ये कुठलेही नाते लपविणे अशक्य होते. मात्र सद्यस्थितीत लव्ह अफेयर्स सीक्रेट ठेवणे जणू काही ट्रेंडच बनला आहे. आता तुम्ही म्हणाल की, याविषयावर आताच सांगण्याचे काय कारण? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण आणि रविना टंडन यांच्यातील त्यावेळेच्या सीक्रेट अफेयर्सचे आता बिंग फुटले असून, त्यावर सर्वदूर खरमरीत चर्चा रंगत आहे. मात्र अजय आणि रविना हे एकमात्र कपल नाही, ज्यांचे सीक्रेट अफेयर्स होते. असे बरेचसे सेलेब्स आहेत की ज्यांच्यात सीक्रेट अफेयर्स रंगलेले आहेत. आज आम्ही हेच सीक्रेट अफेयर्स पब्लिकली करणार आहोत...नर्गिस आणि राज कपूर 
राज कपूर आणि नर्गिस या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पडद्यावर पसंत केले आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार हे रील लाइफच नव्हे तर रिअल लाइफही कपल राहिलेले आहेत. वास्तविक राज कपूर यांच्याशी बºयाचशा अभिनेत्रींचे नावे जोडली गेली आहेत. मात्र राज कपूर नर्गिसच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे दोघे विवाहाच्या बंधनात का अडकले नाहीत? याचे सरळ उत्तर म्हणजे राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर या आहेत. कारण नर्गिसच्या प्रेमात पडण्याअगोदरच राज कपूर यांनी कृष्णा कपूर यांच्याशी विवाह केला होता. शिवाय नर्गिसला हेही चांगले माहीत होते की, राज कपूर कृष्णाला कधीही स्वत:पासून दूर करणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर सुनील दत्त यांच्याशी विवाह केला होता. तसेच राज कपूर यांच्याशी सर्व प्रकारचे नातेही तोडले होते. नर्गिसच्या लग्नाचा राज कपूर यांना चांगलाच धक्का बसला होता. मधुबाला आणि दिलीपकुमार 
सुपरस्टार दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाचे किस्से आजही अनेकांना आठवतात. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामं केले होते, शिवाय या दोघांची जोडीही प्रेक्षकांना भावत असे. त्यावेळी मधुबालाच्या वडिलांनी दोघांना सेटवर एकमेकांना भेटण्याची अनुमती दिली होती; परंतु बाहेर भेटण्यास स्पष्ट शब्दात ताकिद दिली होती. १९५७ ची गोष्ट आहे. त्यावेळी दोघांना ‘नयादौर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जायचे होते. मात्र मधुबालाच्या वडिलांनी तिला शूटिंगसाठी बाहेर जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यामुळे या चित्रपटातून मधुबालाचा पत्ता कट करण्यात आला होता. तिच्याजागी वैजयंतीमाला यांना संधी दिली गेली. याचठिकाणी दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यातील नात्याचा अंत झाला. सुरैया आणि देव आनंद 
त्याकाळी इंडस्ट्रीत सुरैया आघाडीची अभिनेत्री होती, तर देव आनंद हा इंंडस्ट्रीमधील नवा चेहरा होता. मात्र या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये सुरैयाची आजी खलनायक ठरली. सुरैयाच्या आजीला दोघांमधील नाते मान्य नव्हते. कारण दोघांचे धर्म वेगळे होते. सुरैयासाठी देव आनंद सर्व काही सोडण्यास तयार होते; मात्र घरच्यांच्या नकारामुळे सुरैयाने देव आनंदसोबतचे नाते तोडले. त्यावेळी देव आनंदने सुरैयावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा
ज्यावेळी बॉलिवूडमध्ये रिना रॉय हिचे करिअर आघाडीवर होते, त्याचवेळी तिचे शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर अफेयर सुरू होते. काही कामानिमित्त जेव्हा रिना लंडन येथे गेली. तेव्हा शत्रुघ्न यांनी माजी मिस इंडिया पूनम चंडीरामणि यांच्याबरोबर विवाह करून सगळ्यांनाच धक्का दिला. जेव्हा ही बाब रिना हिला कळाली तेव्हा तिने भारतात परतल्यानंतर लगेचच शत्रुघ्न यांना याबाबतचा जाब विचारला. लग्नानंतरही कित्येक वर्ष शत्रुघ्न रिना रॉय यांना भेटत होते. एका मुलाखतीत शत्रुघ्न यांनी सांगितले होते की, रिनाबरोबर त्यांचे नाते तब्बल आठ वर्षे राहिले; मात्र याबाबत पूनम पूर्णत: अनभिज्ञ होती. श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती 
आज श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती त्यांच्या आयुष्यात जरी खूश असले तरी एक जमाना होता, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांपासून दूर राहण्याची कल्पनादेखील करीत नव्हते. वास्तविक त्यावेळी मिथुनने योगिता बाली यांच्याशी विवाह केला होता. अशातही श्रीदेवीसोबतच्या त्याच्या अफेयर्सच्या चर्चा जोरदार रंगत होत्या. परंतु अखेरपर्यंत या दोघांनी त्यांच्यातील नाते जाहीरपणे स्वीकारले नाही. अखेर श्रीदेवीचा बोनी कपूर यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. रेखा आणि अमिताभ बच्चन 
रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्येही या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. मात्र त्यांच्या लव्ह लाइफमध्ये ते यशस्वी होऊ शकले नाही. दोघांनी बºयाचशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘दो अनजाने’ या चित्रपटाच्या सेटवरच हे ‘दो अनजाने दिल’ एकत्र आले होते. पुढे त्यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला होता. मात्र अमिताभने रेखाचे प्रेम कधीच स्वीकार केले नाही. तर रेखा नेहमीच अमिताभबरोबरचे नाते स्वीकारण्यास तयार होती. काही वर्षांनंतर अमिताभने जयाबरोबर लग्न करून रेखाबरोबरचे नाते कायमचे तोडले. त्यानंतर हे दोघे रील आणि रिअल लाइफमध्ये कधीच एकत्र बघावयास मिळाले नाहीत. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त
बॉलिवूडमध्ये संजय दत्तने पहिल्यांदा जर कोणावर प्रेम केले असेल तर ती लाखो लोकांच्या हृदयाची धकधक माधुरी दीक्षित होय. संजय आणि माधुरीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मात्र ‘खलनायक’च्या सेटवर हे दोघे खºया अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघांनी कधीच त्यांच्यातील नाते उघड केले नाही. पण, त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सातासमुद्रापार रंगायल्या लागल्या होत्या. त्यामुळे हे दोघे आता त्यांच्यातील नाते जाहीर करणारच; तोच १९९३ मध्ये संजूबाबाला अवैध शस्त्रास्त्रे बाळगण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. पुढे माधुरी दीक्षितने संजूबाबापासून दूर राहणे पसंत केले. रविना टंडन आणि अक्षयकुमार
रविना टंडन आणि अक्षयकुमार यांच्यातील अफेयर्सविषयी कोणाला माहिती नसेल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. ९०च्या दशकातील टॉपची अभिनेत्री राहिलेली रविना खिलाडी अक्षयकुमार याच्या प्रेमात पडली. ‘मोहरा’ चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जबरदस्त जवळीकता निर्माण झाली होती. रविना तर या नात्यात खूपच सीरियस होती, परंतु अक्षयची छबी काहीसी ‘दिल फेंक आशिक’ अशा प्रकारची होती. कारण त्यावेळी त्याला प्रत्येक मुलीशी प्रेम जडत असे. विशेष म्हणजे त्यावेळी त्याचे नाव रेखाबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळेच रविनाने त्याच्याशी नाते तोडले. मात्र जोपर्यंत या दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यात या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचेही समोर आले होते. शिल्पा शेट्टी आणि अक्षयकुमार
रविनाबरोबरच अफेयर संपुष्टात आल्यानंतर अक्षयकुमार शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडला होता. मात्र म्हणतात ना स्वभावाला औषध नसते, तसेच काहीसे अक्षयबाबत झाले होते. शिल्पा अक्षयवर जिवापाड प्रेम करीत होती, मात्र त्यावेळी अक्षय ट्विंकल खन्नासोबत सूत जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. जेव्हा ही बाब शिल्पाला कळाली तेव्हा तिनेही तेच केले जे रविनाने केले होते. तिने अक्षयला सोडचिठ्ठी दिली. परंतु त्याचबरोबर ट्विंकलच्या रूपाने अक्षयला खरे प्रेम मिळाले. पुढे दोघांनी लग्न केले असून, ते त्यांच्या आयुष्यात सध्या सुखी आहेत.जेसिका हाइन्स आणि आमिर खान
आमिर खान याचे अफेयर जेसिका हाइन्स नावाच्या विदेशी पत्रकारासोबत खूपच चर्चेत राहिले आहे. एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आमिर आणि जेसिका यांची भेट ‘गुलाम’ (१९९८) या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांमध्ये अफेयर सुरू झाले अन् दोघेही लिव्ह इन-रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. असे बोलले जात आहे की, त्यावेळी जेसिका प्रेग्नेंट राहिली होती. तसेच अबॉर्शनसाठी आमिरने तिच्यावर दबावही टाकला होता. आमिरने जेसिकाला म्हटले होते की, एक तर अबॉर्शन कर अन्यथा माझ्यासोबतचे नाते विसरून जा! मात्र जेसिकाने अबॉर्शन करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पुढे ती लंडनला गेली. सध्या ती सिंगल मदर बनून मुलाचा सांभाळ करीत आहे. तिने मुलाचे नाव ‘जान’ असे ठेवले आहे. मात्र अजूनही आमिरने या मुलाचा स्वीकार केलेला नाही. ऐश्वर्या राय आणि सलमान खान 
या दोघांची लव्ह स्टोरी तर आजही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात पहिल्यांदा अन् अखेरीस बघावयास मिळालेली ही जोडी इंडस्ट्रीमधील मोस्ट चार्मिंग जोडी म्हणून ओळखली जायची. परंतु दोघांमधील नाते असे काही तुटले की, आज ते एकमेकांसमोर येणेही पसंत करीत नाहीत. ऐशने सलमानच्या विरोधात कित्येकदा मारपीट आणि धमकावल्याचा आरोप केला होता. पुढे ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याशी विवाह केला. करिना कपूर आणि ऋतिक रोशन 
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून ऋतिक रोशनने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. या चित्रपटात अमीषा पटेलऐवजी करिना कपूरला साइन करण्यात आले होते. तिने काही सीन्सही शूट केले होते. मात्र त्याचदरम्यान हृतिक आणि तिच्यात जवळीकता निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. त्याचकारणाने चित्रपटातून करिनाची हकालपट्टी करण्यात आली. असे बोलले जाते की, आई बबितानेच तिला हा चित्रपट सोडण्यास बजावले होते.अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातीलही सीक्रेट लव्ह अफेयर्स नेहमीच चर्चेत राहिले आहे. कारण बºयाचदा हे दोघे एकमेकांचा हातात हात घालून फिरताना बघावयास मिळाले आहेत. मात्र जेव्हा-केव्हा यांना त्यांच्यातील नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यास केवळ मैत्रीचे नाव दिले. काही दिवसांपूर्वीच या दोघांना एकत्र फिरताना व शॉपिंग करताना बघितले होते. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :