​बॉलिवूडचे ‘हे’ हँडसम डायरेक्टर नाहीत कुठल्या हिरोपेक्षा कमी!

बॉलिवूडमध्ये अनेक हँडसम अ‍ॅक्टर्स आहेत. पण या गुड लूकिंग सेलिब्रिटीजची यादी इथेच संपत नाहीत. या यादीत कॅमे-यामागे आपल्या कलेचे दर्शन घडवणा-या सेलिब्रिटींचाही समावेश करावाच लागेल. होय, हे सेलिब्रिटी म्हणजे, बॉलिवूडचे हँडसम डायरेक्टर्स.

​बॉलिवूडचे ‘हे’ हँडसम डायरेक्टर नाहीत कुठल्या हिरोपेक्षा कमी!
Published: 19 Jun 2017 04:23 PM  Updated: 19 Jun 2017 04:23 PM

शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह बॉलिवूडमध्ये असे अनेक हँडसम अ‍ॅक्टर्स आहेत. पण या गुड लूकिंग सेलिब्रिटीजची यादी इथेच संपत नाहीत. या यादीत कॅमेºयामागे आपल्या कलेचे दर्शन घडवणाºया सेलिब्रिटींचाही समावेश करावाच लागेल. होय, हे सेलिब्रिटी म्हणजे, बॉलिवूडचे हँडसम डायरेक्टर्स. कदाचित तुम्ही फार लक्ष दिले नसेल पण बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शकही कमालीचे हँडसम आहेत. अशाच काही हँडसम डायरेक्टर्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इम्तियाज अली



कुरळे लांब केस, पुरेसी उंची, गुड लूकिंग पर्सनॅलिटी असे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला इम्तियाज अली हा बॉलिवूडचा एक हँडसम डायरेक्टर. ४६ वर्षांचा इम्तियाज आजही बराच यंग आणि हँडसम दिसतो.  इम्तियाजच्या क्यूट स्माईलचेही अनेक ‘दिवाने’ आहेत. इम्तियाजचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी दिसणार आहे.

अयान मुखर्जी



अयान मुखर्जी हाही बॉलिवूडचा एक गुड लूकिंग डायरेक्टर. रणबीर कपूरचा सर्वाधिक जवळचा मित्र असलेल्या अयानने ‘वेक अप सिड’,‘ये जवानी है दिवानी’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अयान प्रचंड फिट आणि हँडसम दिग्दर्शक आहे.

बिजॉय नंबियार



‘शैतान’ आणि ‘वजीर’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारा बिजॉय नंबियारही हँडसम डायरेक्टर्सच्या यादीत सामील आहे. बोलके डोळे असलेल्या बिजॉय  बियर्ड लूकमध्ये चांगलाच हँडसम दिसतो.

अभिषेक कपूर



दिग्दर्शक अभिषेक कपूर आज ४५ वर्षांचा आहे. पण या वयातही तो एकदम फिट आहे. वेल बिल्ड बॉडी आणि बिअर्ड लूकमधील अभिषेकचा हँडसम डायरेक्टर्सच्या यादीत समावेश करावाच लागेल. अभिषेकने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. ‘उफ्फ ये मोहब्बत’मध्ये तो टिष्ट्वंकल खन्नासोबत दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. यानंतर २००६ मध्ये अभिषेकने ‘आर्यन’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘रॉक आॅन’ व ‘काय पो चे’ असे अनेक हिट सिनेमे त्याने दिले आहेत.

कबीर खान



कबीर खान हा बॉलिवूडचा टॉपचा डायरेक्टर. कबीरचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील पण कबीर त्याच्या चित्रपटाइतकाच सुंदरही आहे. हँडसम डायरेक्टरर्सच्या यादीत त्यामुळे कबीर खान नसेल तर नवलच. लवकरच कबीर खान ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. यात सलमान खान लिड रोलमध्ये आहे.

रोहित शेट्टी



रोहित शेट्टी हाही बॉलिवूडचा हँडसम डायरेक्टर. टीव्हीवर आपण रोहितला पाहिले आहे. पण रोहितने मनात आणले असते तर तो अगदी सहज मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून झळकला असता.  रोहितचे वडील हिंदी व कन्नड चित्रपटातील विख्यात फाईट मास्टर होते.  १७ वर्षांच्या वयात ‘फुल और कांटे’मधून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

पुनीत मल्होत्रा


पुनीत हा बॉलिवूडचा हँडसम डायरेक्टर. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पुनीत अस्टिस्टंट डायरेक्टर होता. यानंतर ‘हेट लव्ह स्टोरी’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले.

विशेष भट्ट


भट्ट कॅम्पमधील विशेष भट्ट म्हणजे आणखी एक हँडसम डायरेक्टर. ‘मर्डर3’ हा  दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट. महेश भट्ट यांचा पुतण्या आणि मुकेश भट्ट यांचा मुलगा असलेला विशेष भट्ट यंग व हँडसम डायरेक्टर आहे.


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :