B'day Special : कधीकाळी कोट्यवधींची मालकीण असलेली ‘ही’ अभिनेत्री नाशिकमध्ये जगतेय हलाखीचे जीवन!

कधीकाळी कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण असलेली ‘ह’ अभिनेत्री नाशिकमध्ये अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे, वाचा तिची संघर्षपूर्ण कथा!

B'day Special : कधीकाळी कोट्यवधींची मालकीण असलेली ‘ही’ अभिनेत्री नाशिकमध्ये जगतेय हलाखीचे जीवन!
Published: 16 Feb 2018 09:47 PM  Updated: 16 Feb 2018 09:47 PM

चंदेरी दुनियेला मायानगरी असे संबोधले जाते. कारण या दुनियेत सर्वच अनपेक्षित असते. एखादा रातोरात स्टार होतो, तर एखादा स्टार रातोरात या दुनियेतून गायब होतो. असाच काहीसा प्रसंग ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ जमान्यातील ‘मॉडर्न गर्ल’ यांच्या वाट्याला आला आहे. तब्बल तीन दशके चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री स्मृती बिश्वास-नारंग सध्या नाशिकमध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत. कधीकाळी कोट्यवधी रूपयांची संपत्ती नावे असलेल्या स्मृती आज अवघ्या पाचशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये आयुष्य कुंठित असून, वैद्यकीय उपचारासाठीही पदरी पैसे नसल्याची दयनीय अवस्था त्यांची झाली आहे. 

‘नेक दिल’, ‘अपराजिता’, ‘मॉडर्न गर्ल’ असे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत स्मृती बिश्वास यांनी १९३० ते १९६० अशी तीन दशके बॉलिवूडसह बंगाली चित्रपटसृष्टीत आधिराज्य गाजविले. ९३ वर्षीय स्मृती बिश्वास आज (दि.१७) त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत. आयुष्यात आलेल्या या जगण्याचे दु:ख नसून जवळच्यांनी दिलेला दगा अधिक वेदनादायी असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर ज्या रूपेरी पडद्यावर तब्बल तीन दशके आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली तीच चित्रपटसृष्टी आपल्याला विसरत चालल्याचे दु:खही त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसते. 

दरम्यान, आतापर्यंत २८ ठिकाणे बदलणाºया स्मृती बिश्वास तीन वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्मप्रसारचे काम करणाºया त्यांच्या बहिणीच्या आश्रयाने मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्या. याठिकाणी त्या डॉ. राजीव आणि जितू या दोन अविवाहित मुलांसह एका छोट्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करतात. त्यांची दोन्ही मुले हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठीही पदरी पैसे नसल्याने त्यांची जगण्याची धडपड काळजाला पाझर फोडणारी आहे. अशातही स्वाभिमानानेच जगणार हा स्मृती यांचा निर्धार परिस्थितीलाही हतबल करणारा म्हणावा लागेल. दादासाहेबांच्या भूमितच एकांतवास
राज कपूर, किशोर कुमार, भगवानदादा, नर्गिस, बलराज साहनी यांसारख्या अभिनेत्यांसोबत स्मृती बिश्वास यांनी जवळपास ९० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना भावले असल्याने अनेक पुुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले. त्यातीलच एक ‘दादासाहेब फाळके गोल्डन ईरा’ या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. मात्र दादासाहेबांच्या भूमि त्यांच्यावर एकांतवासात राहण्याची वेळ आली आहे. 

पती प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
स्मृती बिश्वास-नारंग यांचे पती डॉ. एस. डी. नारंग ऊर्फ राजा हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता तथा दिग्दर्शक होते. २५ जानेवारी १९८६ रोजी त्यांचे मधुमेहाने निधन झाले. ते एका प्रसिद्ध स्टुडिओचे मालक होते. पतीच्या निधनानंतरच स्मृती बिश्वास यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला. 

कोट्यवधींची संपत्ती
स्मृती बिश्वास यांची देशभरात कोट्यवधी रूपयांची मालमत्ता आहे. मुंबई, दिल्ली, महाबळेश्वर आदी ठिकाणी त्यांचे बंगले आहेत. मात्र ती सर्व मालमत्ता केअरटेकर मंडळी तसेच काही नातेवाइकांनी बळकावल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर बिल्डर आणि अंडरवर्ल्डमधील काही भार्इंनीही लुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

देवानंद यांचा लग्नाचा प्रस्ताव
सदाबहार अभिनेते देवानंद यांनी स्मृती बिश्वास यांच्यासमोर १९४० मध्ये लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारात डॉ. एस. डी. नारंग यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत न राहता संसारात रममाण होणे अधिक पसंत केले. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :