बॉलिवूड कलाकाराचे चेहरे Behind The Scenes

हर फोटो कुछ केहेता है. प्रत्येक फोटो काढण्यामागे फोटोग्राफरचा एक विचार असतो. मार्क बेनिंगटन या हॉलिवूडच्या छायाचित्रकाराने बॉलिवूड कलाकारांचे काही खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. या प्रत्येक फोटो मागील त्याचे विचारही त्यांने मांडले आहेत.

बॉलिवूड कलाकाराचे चेहरे Behind The Scenes
Published: 04 Apr 2017 07:08 PM  Updated: 05 Apr 2017 02:59 PM

 दीपिका पादुकोण : एका म्युझिक अल्बमचे शूटिंग फिल्म सिटीमध्ये चालू असताना मला हा फोटो काढण्याची संधी मिळाली.  मला आधी वाटले की मला बॅकस्टेजला उभे राहून फोटो काढावे लागतील पण त्यांची रिहर्सल चालू होती तेव्हा हा क्षण मला टिपता आला. बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेची छटा यात दिसते आहे. दीपिकाची एनर्जी आणि कामाबद्दलची उत्सुकता पाहता असे वाटत होते की जणू तिचा सहकलाकार तिला यशाचे शिखर दाखवत आहे.रणबीर कपूर : यश राज फिल्मचे शूटिंग करत असतानाच रणबीर एक अॅड फिल्म शूट करत होता. साधारणता 2011च्या  होळीनंतर मी हा त्याचा फोटो काढला आहे. जेव्हा हा फोटो रणबीर ने स्वतः पहिला तेव्हा तो त्याला खूप आवडला. मला सुद्धा या फोटोमध्ये रणबीरवर येणारा प्रकाश आणि त्याची सावली यांचा मेळ आवडला.  करीना कपूर : मी करीनाला भेटण्याचा खूप प्रयत्न मी करत होतो मग शेवटी अर्जुन कपूर माझ्या मदतीला धावून आला. त्याच्या २ फोन कॉलवरून माझे भेटणे पक्के झाले. करीना जेवढी पडद्यावर सुंदर  दिसते तेवढीच  किंवा त्याहुन जास्त सुंदर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात आहे. मला तिच्या मॅनेजरकडून कळले की मी काढलेले फोटो तिला आवडले.नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक: हा फोटो त्या दोघांबाबत बरेच काही सांगून जातो. हा फोटो मी त्यांची पृथ्वी थिएटरमध्ये रिहर्सल सुरु असताना काढला आहे. मला त्यांचे फोटो काढण्यापेक्षा त्यांच्याशी गप्पा मारायला जास्त आवडले. नसीर हे एक प्रतिभाशाली अभिनेते आहे ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिनसुद्धा. शशी कपूर : बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला हे माहिती की दररोज संध्याकाळी ज्येष्ठ कलाकार शशी कपूर पृथ्वी थिअटरच्या कॅफे परिसरात असतात.  त्यांच्या  फॅन्सला वयाची मर्यादा नाही. त्यांचे फॅन्स जेव्हा त्यांना भेटायला येतात आणि त्यांचे गाजलेले सवांद त्यांच्यासमोर सादर करतात तेव्हा ते शांतपणे बसून त्यांना ऐकतात  आणि त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. अशाच एक फॅन्ससोबतचा निरागस क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. 

.     

अभय देओल: माझी आणि त्याची भेट त्याचा चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या प्रोमो शूटच्या वेळेस झाली.  मी या आधीही अभयला मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटलो होतो. तिथे बाजूला प्रॉडक्शनचे काम चालू होते  तिथे आम्ही चहा प्यायलो बसलो. तिथल्या कलाकारांशी अभय गप्पा मारत बसला असतानाचा हा क्षण  मी कॅमेऱ्यात टिपला होता. यात त्याचा मनमिळाऊ स्वभाव दिसून येतो आहे.सोनाक्षी सिन्हा : सगळ्यांची अपेक्षा होती की मी अभिनेत्री बनाव कारण माझे वडील अभिनेते होते पण मी खूप जाडी असल्यामुळे मी गोष्टीचा विचार कधी केला नाही. मी जेव्हा आरशात स्वत:ला बघायचे त्यावेळी मला एक अभिनेत्री नाही तर जाडी मुलगी दिसायची. स्वरा भास्कर : तन्नू वेड्स मन्नु आणि रांजणा या चित्रपटाच्या यशाआगोदार स्वरा अंधेरी ते चर्चगेट ट्रेनमध्ये आपल्या स्क्रिप्टचा अभ्यास करत असताना टिपलेला हा क्षण. "मुंबईमध्ये राहणे वाटते तितके सोप्प नाही इथे टिकाव घरून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर आणि विचारावर नियंत्रण असणे जरुरी आहे. एकदा का तुम्हाला ते जमले तर तुम्ही जिंकलात असे तिचे मत आहे. 

राजकुमार राव: 2012 मध्ये वर्सोवा इथे शैतान चित्रपटाचे शूटिंग दरम्यान राजने घेतलेली ही उडी मी कॅमेऱ्यात बंदिस्त केली. राजकुमार रावला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याती इच्छा होती आणि देवाच्या कृपेने त्याचे ते स्वप्न तो आज जगतो आहे.  

रणवीर सिंग: या फोटो मागची एक रंजक गोष्ट आहे. मला रणवीरची मुलाखत आणि फोटो काढायचे होते म्हणून मी ग्लोबल इंडियन फिल्म अॅवॉर्डच्या वेळेस त्याच्या ड्रेसिंग रूमच्याबाहेर त्याची वाट पाहत जवळजवळ तासभर उभा होतो. रूममधून गाण्याचा आवाज येत होता आणि अचानक रुमचा दरवाजा उडला रणवीर बाहेर आला. मला काही कळण्याच्या आत तो तिथून धावत सुटला. मला वाटल आता मी इंटरव्ह्यु आणि फोटो दोन्ही मिस केले असे वाटत असतानाच पुढे जाऊन 2 अंगरक्षाकांनी मला अडवले. एवढ सगळ घडत असताना रणवीर स्टेजवर पोहोचला सुद्धा.  पण तेवढ्यात अंगरक्षक दुसरीकडे व्यस्त झाले आणि  मी तिथून निसटलो. माझा कॅमेरा सेट केला तेवढ्यात रणवीर मेकअपसाठी करण्यासाठी स्टेजवरून खाली उतरला आणि मला संधी मिळाली.  मी त्याचे 3 फोटो काढले त्यातलाच हा एक फोटो जो मला एवढे अडथळे पार करून मिळवता आला. रणवीरने जेव्हा फोटो पाहिले तेव्हा त्याला माझे क्लिक आवडले.

 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :