सनी लिओनीच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींनीही अजबगजब मेकअप करून चाहत्यांना घाबरविले!

संपूर्ण चेहºयाला लेप फासलेला सनी लिओनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु असा प्रयोग सनीनेच केला नसून, इतरही काही अभिनेत्रींनी यापूर्वी असाच काहीसा मेकअप करून त्यांच्या चाहत्यांना घाबरविले आहे.

सनी लिओनीच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींनीही अजबगजब मेकअप करून चाहत्यांना घाबरविले!
Published: 20 Sep 2017 01:52 PM  Updated: 20 Sep 2017 01:58 PM

सध्या बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनी सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट रिलीज होणार आहे, परंतु ती चित्रपटामुळे नव्हे तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सनीने दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर मेकअप करतानाचा एक फोटो अपलोड केला. फोटोमध्ये तिच्या चेहºयावर लेप लावलेला होता. मात्र तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर असा काही व्हायरल होत आहे की, जो तो तिच्या या विचित्र मेकअपची चर्चा करीत आहे. खरं तर सनीच नव्हे यापूर्वीही बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या विचित्र मेकअपमुळे चर्चेत आल्या आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा खास वृत्तांत...ऐश्वर्या राय
विश्वसुंदरीचा ताज मिळविलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनही तिच्या अशाच एका विचित्र मेकअपमुळे चर्चेत आली होती. जेव्हा ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तिची पर्पल लिपस्टिक चर्चेचा विषय ठरली होती. ऐश्वर्या अशा पद्धतीने फेस्टिव्हलमध्ये सहभागी होईल, याचा कोणीच विचार केला नव्हता. त्यावेळी ऐश्वर्यावर बरीच टीकाही करण्यात आली.प्रियंका चोपडा
बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणारी प्रियंका चोपडाही अशाच काहीशा मेकअपमुळे चर्चेत आली होती. प्रियंकाचा दुल्हन मेकअप तिच्यावर अजिबातच शोभून दिसत नव्हता. उलट ती या मेकअपमध्ये खूपच विचित्र दिसत होती. कंगना राणौत
सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत कोणी असेल तर ती अभिनेत्री कंगना राणौत होय. दर दिवसाला तिच्याकडून वादग्रस्त वक्तव्य केले जात असल्याने सध्या कंगना प्रचंड चर्चिली जात आहे. असो, कंगनाच्या सौंदर्याविषयी सांगायचे झाल्यास, तिच्यावर फिदा होणाºयांची संख्या कमी नाही. परंतु एकदा कंगनाने असा विचित्र मेकअप केला होता की, तिच्या चाहत्यांकडून ‘हीच का कंगना?’ असा प्रश्न विचारला नसेल तरच नवल. अमिषा पटेल
चित्रपटांमधून गायब असलेली परंतु, सोशल मीडियावर नेहमीच सुंदर फोटो अपलोड करून चाहत्यांच्या संपर्कात राहणाºया अमिषानेही असाच काहीसा विचित्र मेकअप केला होता. वास्तविक अमिषाने मेकअप ठिंकठाक केला होता, परंतु तिने ब्लसर जरा जास्तच लावल्याने ती भलतीच दिसू लागली. दीपिका पादुकोण
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिनेदेखील असाच काहीसा अजब मेकअप करून तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. दीपिकाला या अवतारात बघून असे वाटत होते की, तिने मेकअप केला नसून, संपूर्ण चेहºयाला तेल लावले असावे. तिला या अवतारात बघून तिचे चाहते दंग राहिले नसतील तरच नवल. करिना कपूर-खान 
छोटे नवाब सैफ अली खानची बेगम करिना कपूर-खान हिने एकदा असा मेकअप केला होता, ज्यामध्ये ती सुंदर नव्हे तर हॉरिबल दिसत होती. करिनाला अशा अवतारात बघून तिचे चाहते घाबरले नसतील तरच नवल. सोनम कपूर

आपल्या फॅशनसाठी ओळखली जाणारी सोनम कपूरही अशाच काहीशा विचित्र मेकअपमध्ये स्पॉट झाली होती. तिने ग्रीन इयररिंग्स आणि आॅरेंज लिपस्टिक लावली होती. परंतु ती या मेअकपमध्ये भलतीच दिसत होती. तिचा असा अंदाज तिच्या चाहत्यांनी कधीही बघितला नव्हता.  


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :