जाणून घ्या कोण आहेत सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री?

सत्तरच्या दशकात डिम्पल कपाडिया, झीनत अमान, परवीन भाभी, शर्मिला टागोर, मंदाकिनी, हेलन, पूनम ढिल्लो अशा एकापेक्षा एक बोल्ड अभिनेत्री होऊन गेल्या. या अभिनेत्रींनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये बिकनी घातलेली आहे.

जाणून घ्या कोण आहेत सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री?
Published: 17 Mar 2017 11:23 AM  Updated: 17 Mar 2017 11:29 AM

सत्तर ऐंशीच्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या बोल्डनेसमुळे बॉलिवूड गाजवले. कोण आहेत या बोल्ड अभिनेत्री जाणून घेऊया...

डिम्पल कपाडिया
डिम्पलने बॉबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटानंतर ती अनेक वर्षांनंतर सागर या चित्रपटात झळकली. सागर या चित्रपटात समुद्रकिनारी ती अतिशय बोल्ड अवतारात झळकली होती. 

dimple kapadia

झीनत अमान
झीनत अमान ही सत्तरच्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तिचे बोल्ड रूप पाहायला मिळाले होते. हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटात तर चक्क तिने स्मोक केले होते तर सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील तिच्या बोल्ड अवताराची चर्चा आजही केली जाते. 

Zeenat aman

शर्मिला टागोर
शर्मिला टागोरने अॅन इव्हेनिंग इन पॅरिस या चित्रपटात बिकनी घातली होती. चित्रपटात बिकनी घालणारी शर्मिला ही पहिली अभिनेत्री ठरली होती. तसेच तिने फिल्मफेअर या मासिकासाठी बिकनीमध्ये फोटोशूटदेखील केले होते.     

sharmila tagoreपरवीन बाबी
परवीन बाबी दिवार या चित्रपटमुळे नावारूपाला आली. तिने तिच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या बिंदास वागण्यामुळे ओळखली जात असे. तिने अनेक चित्रपटांमध्ये बिकनी घातलेली आहे. टाइम्स मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी ती पहिली अभिनेत्री होती. 

parveen babi

मंदाकिनी
मंदाकिनी इतकी बोल्ड अभिनेत्री कोणीच नव्हती असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील एका दृश्यात तर तिने अंगप्रदर्शन केले होते. त्या काळातील अभिनेत्री बोल्ड कपडे घालयला नकार देत असताना मंदाकिनी त्या काळाच्या खूप पुढे होती. 

mandakini

हेलन
हेलनने तिच्या अनेक चित्रपटांमध्ये बिकनी, छोटे कपडे घातले आहेत. तिच्या नृत्यातही मादक अदा असायच्या. 

helen

पूनम ढिल्लो
गिरफ्तार, त्रिशूल यांसारख्या चित्रपटांमध्ये पूनम प्रेक्षकांना स्विमिंग सूटमध्ये पाहायला मिळाली होती. 

poonam dhillon


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :