​‘केबीसी’च्या हॉटसीटवर सास-याऐवजी सून?

शाहरूखला तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर बसलेले पाहिलेय. आता शाहरूखशिवाय अन्य कुणाला तुम्हाला या सीटवर बसलेले पाहायला आवडेल? ऐश्वर्या रॉय बच्चन??? धक्का बसला ना?

​‘केबीसी’च्या हॉटसीटवर सास-याऐवजी सून?
Published: 18 May 2017 01:50 PM  Updated: 18 May 2017 01:50 PM

‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन नाही, ही कल्पना तरी तुम्हाला करवते का? कदाचित नाहीच.(याक्षणी हॉट सीटवर बसलेला शाहरूख खान तुमच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही.) पण आता जरा कल्पना कराच. शाहरूखला तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर बसलेले पाहिलेय. आता शाहरूखशिवाय अन्य कुणाला तुम्हाला या सीटवर बसलेले पाहायला आवडेल? ऐश्वर्या रॉय बच्चन??? धक्का बसला ना? होय,   येत्या दिवसांत ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर सास-याऐवजी सून बसलेली दिसण्याची शक्यता आहे. केवळ ऐश्वर्याच नाही तर कदाचित माधुरी दीक्षितही या सीटवर बसलेली दिसू शकते.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कौन बनेगा करोडपती’चे नववे सीझन होस्ट करण्यासाठी अमिताभ यांची लाडकी सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नावावर विचार सुुरू आहे. केवळ विचारच नाही तर यासंदर्भात ऐश्वर्याला विचारणाही झाल्याचे कळते. ऐश्वर्यासोबतच माधुरीशीही निर्मात्यांची चर्चा सुरु आहे. आत्तापर्यंत ‘कौन बनेगा करोडपती’ला फिमेल होस्ट मिळालेली नाही. त्यामुळे शोला वेगळेपणाचा तडका द्यायचा झाल्यास, फिमेल होस्ट हा सर्वोत्कृष्ट पर्याय ठरेल, असा यामागचा विचार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर एक लेडी सेलिब्रिटी निश्चितपणे एक युनिक आयडिया आहे. फक्त ही आयडिया प्रत्यक्षात अमलात आलीच तर प्रेक्षकांच्या ती कशी पसंतीत उतरते, एवढाच एक प्रश्न आहे. कारण अमिताभ यांच्या भारदस्त आवाजाला तोड नाही.  
 तूर्तास ऐश्वर्या किंवा माधुरी दोघींपैकी कुणीही या आॅफरला होकार दिलेला नाही. ऐश्वर्या सध्या कान्समध्ये बिझी आहे. त्यामुळे या बातमीच्या कन्फर्मेशनसाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात अपडेट येताच आम्ही दुसºया क्षणाला तुमच्यापर्यंत ते पोहोचवूच. तोपर्यंत या शोच्या हॉट सीटवर ऐश्वर्या किंवा माधुरी या दोघींना पाहायला तुम्हाला आवडेल की नाही, ते आम्हाला कळवा.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :