Birthday Special : चित्रपट फ्लॉप ठरले तरी आज आहे इशा कोपिकर कोटींच्या संपत्तीची मालकिण..

इशा कोपिकर आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. आज इशा आपला 41वा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. इशाला म्हणवे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळू शकलेले नाही

Birthday Special  :  चित्रपट फ्लॉप ठरले तरी आज आहे इशा कोपिकर कोटींच्या संपत्तीची मालकिण..
Published: 19 Sep 2017 01:14 PM  Updated: 19 Sep 2017 01:14 PM

इशा कोपिकर आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. आज इशा आपला 41वा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. इशाला म्हणवे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळू शकलेले नाही. इशाने हिंदीशिवायस तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.  इशाने गर्लफ्रेंड, डी , डार्लिंग आणि शबरी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. इशाने 'कयामत' सारख्या सुपरहिट चित्रपटात सुद्धा अभिनय केला आहे.  

कॉलेजमध्ये शिकत असताना इशाने फोटोग्राफर गौतम राजध्यक्ष यांच्याकडून फोटोशूट केले होते. यानंतर तिला मॉ़डलिंग आणि अॅडसाठी ऑफर मिळायला लागल्या, 1995 मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यात तिने मिस टैलेंटचा क्राउन जिंकला होता. 1998 मध्ये तमिळ चित्रपट चंद्रलेखामधून इशाने डेब्यू केला. 
2000 मध्ये पहिला बॉलिवूड चित्रपट फिजामध्ये करिशा कपूर आणि ह्रतिक रोशनसोबत काम केले होते. इशाने जवळपास 10 वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले मात्र तरीही तिचे नाणं अभिनयात खणखणीत वाजलेच नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिने स्टेज शो आणि व्हिडिओ अल्बममध्ये काम करायला सुरुवात केली. इशाने काही रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा सहभागी झाली होती.  इशाला खल्लास गर्ल नावाने सुद्धा बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. तिने केलेल्या खल्लास गर्ल नावाचे आयटम साँग चांगलेच हिट झाले होते. 

इशा कोपिकरच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायच झाल कर ती खूपच वादग्रस्त राहिली. लग्नाच्या आधी इशाचे अफेयर  इंदर कुमारसोबत होते.  मात्र इंदराच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. काही दिवसांपूर्वीच इंदरचे हार्ट अॅटकमुळे निधन झाले आहे.  इंदराच्या निधनानंतर इशाने अनेक खुलासे केले होते. इंदरच्या पहिल्या पत्नीने तो इशाला विसरु शकला नसल्याचे सांगितले होते.

इशाने 2009 साली बिझनेसमन टिम्मी नारंगशी लग्न केले. लीना मोगरे आणि प्रीती झिंटाने इशाची ओळख टिम्मीशी करुन दिली होती. इशाच्या लग्नात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये भलेही इशाचे करिअर चालले नाही.  मात्र आज इशा कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. 


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :