10 years of Chak de! India: ​शाहरूख खानची टीम सध्या काय करतेय?

‘चक दे इंडिया’ या चित्रपटाची कथा सगळ्यांचा मनाला भावली होती. यातील शाहरूखच्या हॉकी टीमनेही सगळ्यांची मने जिंकली होती. अनेक नवे चेहरे या टीममध्ये दिसले होते. १० वर्षांनंतर या टीममधील हे चेहरे आज कुठे आहेत, जाणून घेऊयात...

10 years of Chak de! India: ​शाहरूख खानची टीम सध्या काय करतेय?
Published: 10 Aug 2017 02:59 PM  Updated: 10 Aug 2017 02:59 PM

शाहरूख खान स्टारर ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट विस्मृतीत जाणे शक्य नाही. होय,आज (१० आॅगस्ट २०१७) या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झालीत. पण तरिही या चित्रपटाच्या आठवणी ताज्या आहेत. २००७ साली प्रदर्शित झालेल्या शिमित अमीनने दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे प्र्रमुख भूमिकेत दिसले होते.  कबीर खान नावाच्या भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधाराची भूमिका शाहरूखने यात साकारली होती. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे त्याला भारतीय हॉकी संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वषार्नंतर हरवलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी तो वादग्रस्त भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. वादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ या वाटचालीमध्ये खान गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवतो. त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करणारे लोक पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात, अशी या चित्रपटाची कथा सगळ्यांचा मनाला भावली होती. यातील शाहरूखच्या हॉकी टीमनेही सगळ्यांची मने जिंकली होती. अनेक नवे चेहरे या टीममध्ये दिसले होते. १० वर्षांनंतर या टीममधील हे चेहरे आज कुठे आहेत, जाणून घेऊयात...

सागरिका घाटगेसागरिका घाटगे हिने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात प्रीती सभरवालची भूमिका साकारली होती. अलीकडे सागरिका नसीरूद्दीन शहा यांच्या ‘इरादा’ या चित्रपटात दिसली होती. अलीकडे तिने क्रिकेटपटू जहीर खान याच्यासोबत साखरपुडा केला.लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.

चित्राशी रावतचित्राशी रावत हिने या चित्रपटात कोमल चौटाला नामक पात्र साकारले होते. या चित्रपटानंतर चित्राशी अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये दिसली. तूर्तास ती ‘शंकर जय किशन’ या शोमध्ये दिसतेय. 

शिल्पा शुक्लाशाहरूखच्या हॉकी टीममध्ये बिंदिया नायक या खेळाडूच्या रूपात दिसलेली शिल्पा ‘बीए पास’ या चित्रपटात दिसली होती. पण यानंतर ती एकाही चित्रपटात झळकली नाही. चित्रपट सोडून शिल्पाने थिएटरकडे आपला मोर्चा वळवला आहे. अलीकडे महेश दत्तानीच्या ‘द बिग फॅट सिटी’ या सिनेप्लेमध्ये ती दिसली होती.

तान्या अबरोलशाहरूखच्या टीममधील बलबीर कौर तुम्हाला आठवत असेलच. बलवीरची भूमिका साकारणारी तान्या सीआयडी व अशा काही मालिकेत दिसली. सध्या ती पंजाबी चित्रपटांसह काही वेब सीरिजमध्ये बिझी आहे.

शुभी मेहताशुभी मेहता ही ‘चक दे इंडिया’मध्ये गुंजन लखानीच्या भूमिकेत दिसली होती. ‘आमरस’ या चित्रपटानंतर शुभी एका शॉर्टफिल्ममध्ये दिसली. सध्या म्हणाल तर शुभी एक बिझनेस वूमन बनली आहे. होय, गुडगावस्थित शुभीची कंपनी कार्पोरेट ट्रेनिंग देते.

विद्या मालवदेशाहरूखच्या हॉकी टीममधील गोलकिपर विद्या शर्मा अर्थात विद्या मालवदे आता योगा इन्स्ट्रक्टर बनली आहे. जगभरात योगाभ्यास शिबीरे घेत ती फिरत असते.

सीमा आझमी (राणी डिस्पोटा)सीमा आझमीचा स्वत:चा एक थिएटर ग्रूप आहे. यात ती लेखन, दिग्दर्शन व अभिनय करते.

मसोचोन शाहरूखच्या टीममध्ये मौली जिमिक या मणिपुरी खेळाडूची भूमिका साकारणारी मसोचोन सध्या तिच्या मूळ गावी एका एनजीओत काम करतेय. लग्न करून आपल्या संसारात रमलेली मसोचोनला एक मुलगी आहे.

अनाइता नायर आलिया बोसची व्यक्तिरेखा साकारणारी अनाइता हिने २०११ मध्ये लग्न केले आणि ती सिंगापूरला स्थायिक झाली. अनाइता आता एका मुलीची आई आहे.

आर्या मेननगुल इकबाल हे पात्र रंगवाणारी आर्याची स्वत:ची एक प्रॉडक्शन कंपनी आहे. यात ती अ‍ॅडफिल्म्स प्रोड्यूस करते.

सांडिया फर्टांडो
नेत्रा रेड्डी या खेळाडूची भूमिका साकारणारी सांडिया लग्न करून लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. ती पीआर प्रोफेशनल आहे.


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :